युक्रेनहून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू देणार नाही, पंतप्रधानांशी बोलणार; मंत्री देशमुखांची ग्वाही

मंत्री देशमुख म्हणाले की, सध्या रशिया व युक्रेन या देशांतील युध्दामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी सहाय्य करण्यासाठी राज्य शासन व पंतप्रधान यांच्याशी राज्यपाल महोदयांमार्फत चर्चा करण्यात येईल. यासंदर्भात विद्यापीठाने पुढाकार घ्यावा व परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी संशोधनपर अहवाल सादर करावा.

युक्रेनहून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू देणार नाही, पंतप्रधानांशी बोलणार; मंत्री देशमुखांची ग्वाही
मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत आरोग्य विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ झाला.
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 5:19 PM

नाशिकः नाशिक (Nashik) येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी लवकरच वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रारंभ होणार आहे. सध्या युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. त्यासाठी पंतप्रधानांशी बोलू, अशी ग्वाही बुधवारी प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी केली. ते विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होते. विद्यापीठाचा 21 वा दीक्षांत समारंभ ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या अध्यक्षेतखाली झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक तथा केंद्र सरकारच्या आरोग्य संशोधन विभागाचे सचिव प्रा. डॉ. बलराम भार्गव. कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी एन.व्ही. कळसकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

इंटीग्रेटेड मेडिकल कॉम्प्लेक्सचा समावेश

दीक्षांत समारंभ कार्यक्रमात मंत्री अमित देशमुख म्हणाले की, आरोग्य विज्ञान विद्यापीठात होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयातून आरोग्य शिक्षण व संशोधनासाठी विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. आरोग्य शिक्षणातील सर्व विद्याशाखांचा समावेश असलेल्या ‘इंटीग्रेटेड मेडिकल कॉम्प्लेक्स’चा समावेश यात करण्यात यावा. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व पुढील वर्षी विद्यापीठ स्थापनेचा रौप्य महोत्सव हा विलक्षण योग असल्याचेही त्यांनी सांगितले.

संशोधनपर अहवाल सादर करा…

मंत्री देशमुख म्हणाले की, सध्या रशिया व युक्रेन या देशांतील युध्दामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी सहाय्य करण्यासाठी राज्य शासन व पंतप्रधान यांच्याशी राज्यपाल महोदयांमार्फत चर्चा करण्यात येईल. यासंदर्भात विद्यापीठाने पुढाकार घ्यावा व परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी संशोधनपर अहवाल सादर करावा. विद्यापीठाने कुलगुरू यांच्या निर्देशानुसार ‘व्हिजन डॉक्युमेंट’ उपक्रम अंतर्गत कार्य करावे. ज्ञान हे बदलासाठी शक्तीशाली साधन आहे. समाजाच्या विकास व कल्याणासाठी ज्ञानाची निर्मिती व उपयोजन महत्वपूर्ण आहे. राष्ट्र बांधणीच्या प्रक्रियेत आरोग्य क्षेत्राचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टर हा समाज व्यवस्थेचा आदरणीय घटक आहे. आरोग्य सेवा क्षेत्रात डॉक्टरांचे कार्य उल्लेखनीय आहे. प्रत्येकाच्या जीवनात किंबहुना प्रत्येक रुग्णांच्या वैयक्तिक प्रसंगात डॉक्टर सहभागी असतात. समाजाचा आनंद व कल्याण जोपासण्याचे सेवाभावी कर्तव्य सर्वांनी करावे असे आवाहन त्यांनी केले.

संशोधनावर लक्ष द्यावे

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक प्रा. डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, सामाजिक शास्त्रांसमवेत विज्ञान व तंत्रज्ञान जोडून त्यांचे एकत्रित संशोधन होणे सद्यस्थितीत गरजेचे आहे. यामुळे तंत्रज्ञानातील बदलांचा समाजाला उपयोग होऊ शकतो. स्वदेशी विकास आणि संक्रमणातील विकास या विकासाच्या नव्या वाटा आहेत. याकडे नव्या पिढीने अधिक लक्ष द्यायला हवे. विद्यार्थ्यांनी करमणुकीत फारसे न गुंतता संशोधनावर लक्ष द्यायलाच हवे. भारतातील तरुणांनी विशिष्ट ध्येयाने प्रेरीत होऊन काम करायला हवे. प्रत्येक विद्यार्थ्याने पर्यावरण रक्षणासाठी जागृत होऊन कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

इतर बातम्याः

Nashik | आरोग्य विद्यापीठाने देशात आदर्श निर्माण केला; राज्यपालांकडून कौतुक, 98 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक!

Nashik | गाडगेबाबांच्या धर्मशाळेत 85 वर्षांपासून अविरत अन्नछत्र; वंचिताचा अनोखा आधारवड!

कोट्यवधींची उड्डाणे घेणाऱ्या साहित्य संमेलनाचा हिशेब द्या; नाशिकमध्ये निमंत्रकांना घरचा आहेर

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....