The Burning Bus : नाशिक-औरंगाबाद मार्गावर शिवशाही पेटली; काळ आला होता, पण…!

नाशिक-औरंगाबाद (Nashik-Aurangabad) राज्य मार्गावर शिवशाही बसला (bus) आग (fire) लागल्याची घटना घडली आहे. निफाड तालुक्यातील बोकडदरे येथे ही घटना घडली. औरंगाबाद येथून ही गाडी नाशिककडे जात होती.

The Burning Bus : नाशिक-औरंगाबाद मार्गावर शिवशाही पेटली; काळ आला होता, पण...!
येवला तालुक्यातल्या देशमाने येथे शिवशाही जळून खाक झाली.
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 1:02 PM

नाशिकः नाशिक-औरंगाबाद (Nashik-Aurangabad) राज्य मार्गावर शिवशाही बसला (bus) आग (fire) लागल्याची घटना घडली आहे. निफाड तालुक्यातील बोकडदरे येथे ही घटना घडली. औरंगाबाद येथून ही गाडी नाशिककडे जात होती. मात्र, येवला तालुक्यातल्या देशमाने येथे ही गाडी अचानक बिघडली. बसमधून जवळपास दहा ते पंधरा प्रवासी प्रवास करत होते. मात्र, बस बंद पडल्याने त्यांना दुसऱ्या बसमध्ये बसवून देण्यात आले होते. त्यानंतर बिघडलेल्या बसने पेट घेतला. आगीचे कारण सध्या स्पष्ट नसले, तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीचा अधिक तपास निफाड पोलिस करत आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीही राज्यभरात अनेकदा शिवशाही बसला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, त्यानंतरही या घटनांचे चक्र सुरूच आहे. जर शिवशाही सदोष असतील, तर त्यांच्यामध्ये दुरुस्ती का केली जात नाही, असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे.

महिन्यात दुसरी घटना

गेल्याच महिन्यात सांगलीहून पुण्याला जाणाऱ्या शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर चालकाने ही बस रस्त्याच्या कडेला उभी केली. बसमधील प्रवाशांना खाली उतरण्याच्या सूचना दिल्या. अग्निशमन दलाच्या दोन गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. या बसमध्येही जवळपास 40 प्रवासी होते. हे सारे प्रवासी गाडीचे चालक शेरअली सिराज फकीर यांनी प्रसंगावधान दाखवल्याने बचावले. त्यानंतरही पुन्हा लगेच नाशिक जिल्ह्यात शिवशाहीला आग लागल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

कधी होणार दोषमुक्त?

शिवशाही आग लागण्याच्या घटना जुन्याच आहेत. शिवशाही बसमध्ये काही दोष असतील आणि त्रुटी असतील तर त्या तात्काळ दूर कराव्यात. अन्यथा हे प्रवाशांच्या जीवाशी खेळणे होणार आहे. प्रत्येक वेळी आग लागलेली समजेल, असे नसते. एखाद्या वेळेस धोका होऊ शकतो. त्यावेळी प्रवाशांच्या जीवावर बेतल्यानंतर एसटी प्रशासन जागे होणार आहे का, असा सवाल यानिमित्ताने करण्यात येत आहे.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.