उद्धव ठाकरे यांची नारायण राणेंवर सडकून टीका; म्हणाले, बिनडोक लोक…

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकेर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राणेंनी शंकराचार्यांवर केलेल्या वक्तव्याचा धागा पकडत ठाकरेंनी नाशिकमधील सभेत सडकून टीका केली.

उद्धव ठाकरे यांची नारायण राणेंवर सडकून टीका; म्हणाले, बिनडोक लोक...
UddhavThackeray Narayan rane
Follow us
| Updated on: Jan 23, 2024 | 8:11 PM

नाशिक :ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील सभेमध्ये सत्ताधाऱ्यांवर आसुड ओढलं आहे. हिंदू धर्माचे ज्येष्ठ धर्मगुरु शंकाराचार्य यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला जाणार नसल्याचं म्हटलं होतं. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकाराचार्यांनी हिंदू धर्मासाठी दिलेलं योगदान सांगावं असं म्हणत निशाणा साधला होता. याचाच धागा पकडत उद्धव ठाकरेंनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंच राणेंवर निशाणा

काही बिनडोक लोकं तर शंकराचार्याचं योगदान काय विचारत आहेत. सनातन धर्मावर बोलल्यास तुमची तळपायाची आग मस्तकात जाते. तुम्ही सनातन धर्माला मानता की नाही. तुमच्या पक्षात बाजारबुणगे भरले आहेत. भ्रष्टाचारी घोटाळेबाज तुम्ही घेतली. भाजपमध्ये आज भ्रष्टाचाऱ्यांना मान आहे. पण शंकराचार्यांना आहे की नाही. मग मोदींचं राजकारण हा काही नवीन धर्म काढता. तुम्ही भ्रष्टाचारांशी बोलता, हुडी घालून बोलता. लपून छपून भेटता. प्रफुल्ल पटेलसोबत फोटो येत आहे. ज्याने मिर्चीबरोबर व्यवहार केला. देशद्रोही इक्बाल मिर्चीबरोबर व्यवहार केला म्हणून बोंबलणारे तुम्हीच होता असं उद्धव ठाकरे म्हणाले.

कारसेवकांना सर्वांच्या वतीने वंदन करतोय. काल काळाराम मंदिरात गेलो. सावरकरांच्या जन्मभूमीत गेलो. अयोध्या ही श्रीरामचंद्राची जन्मभूमी आहे. पंचवटी ही पराक्रम भूमी आहे. आता जे मंदिर आहे. तिथे पर्णकुटी होती. तिथे राम सीता लक्ष्मण राहिले होते. शृपर्णखेचं नाक आणि कान इथेच कापलं आहे. त्यानंतर 14 हजार राक्षस रामाला मारायला आले होते. आता जे भव्यदिव्य स्वरुप आहे. तसं रामचंद्राने अतिभव्य काल स्वरुप धारण करून राक्षसाचा वध केला होता. कालस्वरुप म्हणजे काळाराम. तो माझ्यासमोर बसला आहे. आम्ही रामम मंदिराला विरोध करतो असं नाही. कारण तो अस्मितेचा प्रश्न आहे. काल मला शिवसेनाप्रमुखांची आठवण आल्याचं ठाकरे यानी म्हटलं आहे.

राजकारण्यांची एक सीमा असते. त्यांच्यावर काही बंधनं असतात. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात विधीचं पालन विधिवत व्हायला हवं. प्रत्येक क्षेत्रात हस्तक्षेप केल्यास तो राजनेत्याचा उन्माद मानला जातो, असं शंकराचार्य यांनी म्हटलं होतं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.