कल्पकता आणि धाडस म्हणजे गडकरी, भुजबळांकडून कोडकौतुक; केंद्रीय मंत्री पवार म्हणाल्या विरोधकही संबोधतात ‘रोडकरी’

कल्पकता आणि धाडसाचे दुसरे नाव म्हणजे नितीन गडकरी, असे म्हणत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कोडकौतुक केले.

कल्पकता आणि धाडस म्हणजे गडकरी, भुजबळांकडून कोडकौतुक; केंद्रीय मंत्री पवार म्हणाल्या विरोधकही संबोधतात 'रोडकरी'
छगन भुजबळ आणि नितीन गडकरी.
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 11:59 AM

नाशिकः कल्पकता आणि धाडसाचे दुसरे नाव म्हणजे नितीन गडकरी, असे म्हणत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कोडकौतुक केले.

नाशिकमध्ये गडकरींच्या हस्ते राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलासह तब्बल 2048 कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. नाशिकमधल्या मनोहर गार्डन येथे हा भव्यदिव्य सोहळा पार पडला. यावेळी भुजबळांनी खास आपल्या शैलीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कौतुक केले. भुजबळ म्हणाले, कल्पकता आणि धाडस याचं दुसरं नाव म्हणजे नितीन गडकरी. ते प्रगतीची स्वप्नं दाखवतात आणि ती साकार करण्याची क्षमताही ठेवतात. फक्त मुंबई-नाशिक रस्त्याची अवस्था वाईट झालीय. त्यामुळे गडकरी साहेबांनी पुढच्या वेळी मुंबईहून नाशिकला येताना कारने यावे. म्हणजे रस्त्यावर किती खड्डे पडलेत हे कळेल आणि त्याचं काय करायचं याचा निर्णय लगेच होईल. मात्र, आताही नितीन गडकरी रस्त्यांची घोषणा करतील आणि उद्याची हेडलाईन तीच असेल, असा विश्वासही व्यक्त केला.

विरोधकही रोडकरी म्हणतात

केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यावेळी म्हणाल्या, नाशिककरांना गडकरी साहेबांची कायम प्रतीक्षा असते. तुम्ही येताना काही तरी घेऊन येतात. जाताना काही तरी देऊन जातात. संपूर्ण महाराष्ट्राला आपली मदत होते. रस्त्यांचे महत्त्व खूप आहे. पार्लमेंटमध्ये साहेब उभे असतात, तेव्हा विरोधक देखील साहेबाना रोडकरी म्हणून संबोधतात. आम्ही भाग्यवान आहोत. आमच्या अजून मागण्या नक्की पूर्ण होतील. आर्थिक विकासाला गती देणारा महामार्गांचा विकास होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

संपूर्ण देश त्यांची वाट बघतो

केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले, आपण भूमितीचं पुस्तक चाळतो. त्यात त्रिकोण षटकोण सर्व सापडतं, पण भूमितीच्या पुस्तिकेत दृष्टीकोन सापडत नाही. तो गडकरी साहेबांमध्ये आहे. कुठला ही भेदभाव न ठेवता संपूर्ण देश माझा मतदार संघ आहे, असं ते म्हणतात. भारती ताई फक्त नाशिककर नाही तर, संपूर्ण देश त्यांची वाट बघत असतो. गडकरी साहेब एक विनंती आहे. मुंबई-नाशिक रस्त्यावर प्रचंड वाहतूक आहे. त्यामुळे इथं कायम खड्डे पडतात. तेव्हा नाशिक- मुंबई महामार्ग पूर्णतः सहा लेन करावा, अशी मागणी त्यांनी केली.

इतर बातम्याः

नाशिक-मुंबई दोन तासांत; गडकरी म्हणतात टेप करून ठेवा, एकही आश्वासन खोटं होणार नाही, पाडला घोषणांचा पाऊस

नाशिकमध्ये महसुली कामकाजाची होणार तपासणी; विभागीय आयुक्तांचे आदेश, अनेकांचे धाबे दणाणले

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.