Video – कोब्रा नाग-नागिणीची अजब प्रेम कहाणी, नागिणीच्या मृत्यूनंतर नाग फणा उभारून बसला
काही कारणामुळे नागिनीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागीनीसोबत असलेला नाग तिथं फणा काढून उभा असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर तो व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद करणाऱ्या इसमाकडे एकटक पाहत आहे.
नाशिक – माणूस असो किंवा पशु पक्षी सर्वांमध्ये प्रेम हा अविभाज्य घटक आहे. नाग-नागीनमध्ये असलेली अतूट प्रेमाची अशीच एक अजब घटना नांदगावमध्ये (Nandgaon) समोर आली आहे. कोब्रा (Kobra) जातीचं नाग-नागीनचं जोडप टाईल्स बनविणाऱ्या कारखान्याच्या अवतीभवती फिरायचं. मात्र अचानक नागीनचा मृत्यू झाला, आपली प्रेयसी आपल्याला सोडून गेली यावर नागाचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे तो तिच्या मृतदेहाजवळ फणा उभारून बसला होता. कारखान्यातील कामगारांनी हे दृश्ये पाहिल्यानंतर त्यांनी सर्प मित्राला बोलावले त्याने अथक प्रयत्न करून नागाला पकडल्यानंतर त्याला निसर्गाच्या सहवासात सोडले. तर मयत झालेल्या नागीनला वन विभागाच्या (Forest Department) हवाली केले.
नेमकं व्हिडीओत काय आहे
काही कारणामुळे नागिनीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागीनीसोबत असलेला नाग तिथं फणा काढून उभा असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर तो व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद करणाऱ्या इसमाकडे एकटक पाहत आहे. आपली प्रेयसी सोडून गेल्याचं त्याला खरं वाटतं नसल्याने तो त्याच जागी उभा आहे. टाईल्स बनवणाऱ्या कंपनीच्या आवारात नाग नागिनीचं जोडपं अनेक वर्षापासून राहत आहे. तिथल्या कामगारांना सुध्दा यांची सवय झाली होती. त्यामुळे दिवसा अनेकदा त्यांचं दर्शन कामगारांना व्हायचं. परंतु अचानक मृत्यू झाल्यानंतर नाग जाग्यावरून हलत नसल्याने पाहणाऱ्यांना आच्छर्य वाटले आहे. तसेच हा व्हिडीओ व्हायरल झाला असून परिसरात याची चर्चा देखील आहे.
कराडमधील देखील व्हिडीओ व्हायरल झाला होता
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात अचानक दोन साप रस्त्यावर खेळताना दिसून आले होते. दुपारी भररस्त्यात दोन साप खेळताना पाहून अनेकांना आच्छर्य वाटलं होतं. कारण आजूबाजूला जमलेल्या लोकांना न घाबरता दोन साप रस्त्यात खेळत होते. लोकांना हे दिसल्यानंतर लोकांनी गोंधळ घातला होता. परंतु दोन्ही साप जाग्यावरून हटले नव्हते. तो व्हिडीओ सुध्दा कराड परिसरात प्रचंड व्हायरल झाला होता.