आनंदाच्या शिधाला उशीर का? बाळासाहेब थोरातांनी सांगितलं कारण

त्यामुळे नेत्यांचे फोटो कदाचित गंभीर असतील.

आनंदाच्या शिधाला उशीर का? बाळासाहेब थोरातांनी सांगितलं कारण
बाळासाहेब थोरात म्हणतात...Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Oct 19, 2022 | 7:20 PM

नाशिक : राज्य सरकारनं आनंदाची शिधा शंभर रुपयांत देण्याची घोषणा केली. काही ठिकाणी आनंदाची शिधा पोहचली. पण, काही ठिकाणी अद्याप आनंदाची शिधा पोहचली नाही. याला उशीर का होतोय, यावर बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिलंय. ते म्हणाले, 100 रुपये किलो देणारे किटवर नेत्यांचे फोटो चांगले छापले नाहीत म्हणून उशीर होत आहे. गंभीर असलेले नेत्यांचे फोटो किटवर लावण्यात आले होते. त्यामुळं आता किमान दिवाळीनंतर नागरिकांना किट मिळेल, अशी अपेक्षा करूया, असंही ते म्हणाले. सरकार सध्या टेंशनमध्येच आहे. त्यामुळे नेत्यांचे फोटो कदाचित गंभीर असतील. हे काय वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही, अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेस अंतर्गत अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. त्यांचा अनुभव मोठा आहे. गेल्या 50 वर्षापासून ते संसदीय कामकाजात आहेत. केंद्रीय मंत्री आणि विरोधीपक्ष नेते म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. एक अनुभवी नेता काँग्रेस पक्षाला अध्यक्ष म्हणून मिळाले आहेत, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

मतदानामध्ये गडबड झाली आहे असे जे आरोप होत आहेत ते चुकीचे आहेत. अत्यंत खुल्या वातावरणात मतदान झाले आहे. सोनिया गांधी यांनी अतिशय कठीण काळात काम केले आहे. आता देखील काळ कठीण आहे. मात्र खरगे यांच्यावर काम करतील, असा विश्वास आहे.

राहुल गांधी हेदेखील सध्या भारत जोडो यात्रा करत आहेत. सोनिया गांधी यांचे मार्गदर्शन राहील. मात्र काम अध्यक्षांना करावे लागणार आहे. खरगे साहेब उत्तम मराठी बोलतात. आपल्यासाठी ते चांगलं आहे. येणारा 2024 वर्ष आमच्यासाठी खूप यश देणारे असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बाळासाहेब थोरात म्हणाले, भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला होणे हे दुर्दैवी घटना आहे. घरावर हल्ला करणं हे लोकांना रुचणार नाही. मागच्या काही दिवसापासून जे राजकारण सुरू आहे ते महाराष्ट्राला रूचणारं नाही.

सध्या तरी पाणीटंचाई नाही. ओला दुष्काळ जाहीर करा, अशी परिस्थिती आहे. सगळे पीक खराब झाले आहेत. तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावे ही आमची मागणी आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हंटलं.

शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी खूप खराब जात आहे. अजून पंचनामे नाही तर भरपाई कुठून देणार आहेत. फक्त घोषणा करून चालणार नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.