नाशिक-सिन्नर मार्गावर या महिलेने चालवली एसटी बस, प्रवाशांकडून कौतुकाचा वर्षाव 

नाशिक ते सिन्नर या मार्गावर महिलेने एसटी बस चालवली. त्यामुळे या महिलेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आता घर आणि एसटी बस या दोन्हीचे स्टेरिंग त्यांना चालवावं लागणार आहे.

नाशिक-सिन्नर मार्गावर या महिलेने चालवली एसटी बस, प्रवाशांकडून कौतुकाचा वर्षाव 
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 5:06 PM
चैतन्य गायकवाड,  प्रतिनिधी, नाशिक : महिलांनी बहुतेक सर्व प्रांत पादाक्रांत केले आहेत. आता एसटी बसमध्ये आधी महिला वाहक दिसायच्या.  आता चालकही दिसू लागल्या आहेत. एक वर्ष महिलांना बसटी बस चालकाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून सराव करून घेण्यात आला. नाशिक ते सिन्नर या मार्गावर महिलेने एसटी बस चालवली. त्यामुळे या महिलेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आता घर आणि एसटी बस या दोन्हीचे स्टेरिंग त्यांना चालवावं लागणार आहे. एसटी बस या खूप जुन्या आहेत. त्यामुळे चालकांना कंबरेच्या समस्या सुरू होतात. त्यामुळे नवीन एस बस आणणे गरजेचे आहे. अन्यथा आरोग्याच्या समस्या जास्त उग्र रूप धारण करू शकतात.

माधवी साळवे यांनी चालवली एसटी बस

एसटी महामंडळाच्या इतिहासात काल एक ऐतिहासिक घटना घडली. नाशिक ते सिन्नर या मार्गावर प्रथमच एका महिला चालकाने एसटी महामंडळाची बस चालवली. माधवी साळवे या महिला चालकाने ही कौतुकास्पद कामगिरी केली.

महिला चालक पदावर निवड

माधवी साळवे या नाशिकमधील पहिल्या एसटी महिला ड्रायव्हर ठरल्या आहे. नाशिकमधील धुडगाव येथे राहणाऱ्या माधवी यांचा गृहिणी ते बस ड्रायव्हर असा प्रवास कौतुकास्पद आहे. एसटी महामंडळाने 2019 च्या भरती प्रक्रियेत 206 महिलांची चालक या पदावर निवड केली.

लहानपणापासून गाड्या चालवण्याची आवड

या सर्व महिलांना एक वर्ष हेवी व्हेईकल चालवण्याचे ट्रेनिंग देण्यात आले. त्यानंतर या महिलांनी एक वर्ष एसटी बस चालवण्याचा सराव केला. आता या महिलांना एसटी बसवर रीतसर रूजू करून घेण्यात आले आहे. माधवी यांना लहानपणापासून गाड्या चालवण्याची आवड आहे. एसटी महामंडळात कुणीही महिला नसल्याने एसटीची निवड केल्याचे माधवी सांगतात. जास्तीत जास्त महिलांनी या क्षेत्रात येण्याचे आवाहन त्यांनी केले.

सासवड – नीरा बस चालवली महिलेने

पुण्यातील सासवड आगारातील महिला बस चालक अर्चना आत्राम यांनी काल पासून सासवड आगारात आपल्या कर्तव्याला सुरवात केलीय. आज शुक्रवारी सासवड नीरा बस घेऊन त्या नीरा बस स्थानकात आल्या. त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केलंय. राज्यातील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक कंपनी असणाऱ्या राज्य परिवहन मंडळात मात्र आता चालकाच्या सीटवर महिला चालक दिसणार आहे. परिवहन मंडळाने 17 महिला बस चालकांची नियुक्ती केलीय. यातील सासवड आगाराच्या अर्चना आत्राम या पहिल्या बस चालक ठरल्यात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.