Yeola | पैठणीच्या माहेरघरात 3 महाराणी पैठणींची चोरी! महिला चोर CCTV कॅमेऱ्यात कैद
Paithani Saree Theft : ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. गुरुवारी 17 मार्च रोजी दुकानांमधील महाराणी पैठणीचा स्टॉक चेक करत असताना तीन महाराणी पैठणी कमी असल्याचं लक्षात आले.
येवला : पैठणी साडी (Paithani Saree) हा स्त्रियांसाठी फारच आवडीचा असा पेहराव. मात्र पैठणीचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या येवल्यातच पैठणींची चोरी झाली आहे. दोन महिलांनी खरेदीचा बहाणा करत महाराणी पैठणी साड्यांची चोरी केली असल्याचं उघड झालंय. 75 हजार रुपये किंमतीच्या तीन महाराणी पैठणी (Maharani Paithani Theft) चोरल्या गेल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिक-औरंगाबाद (Nashik-Aurangabad) राज्य मार्गावरील येवला तालुक्यात जळगाव नेऊर इथं चोरीची ही घटना घडली. चोरीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. याप्रकरणी आता पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आता सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं भामट्या महिलांचा शोध घेण्यास सुरुवाती केली आहे. 17 मार्च रोजी दुकानातील साड्यांची पाहणी करत असतेवेळी महाराणी साड्या गहाळ झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर या साड्या नेमक्या गेल्या कुठे म्हणून शोधाशोध केली गेली. मात्र अखेर कुठेच या साड्या न सापडल्यानं या साड्या चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पैठणी साडीतल्या महाराणी साड्यांची चोरी झाल्याचं उघडकीस आलं.
कधी झाली चोरी?
सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर 12 मार्च रोजी चोरीची ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. 12 मार्च रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दोन महिला पैठणी खरेदी करण्यासाठी आल्या होत्या.
नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावर असलेल्या लावण्य पैठणी या शोरूम मध्ये दोन महिला पैठणी खरेदी करण्यासाठी आल्या. त्यांनी घरात लग्न असल्याने महागड्या आणि दर्जेदार पैठणी दाखवण्याची मागणी केली. या वेळी 25 हजार रुपये किमतीची महाराणी पैठणी दाखवण्यात आली. या पैठणी दाखवल्यानंतर यातील आणखीन व्हरायटी दाखवण्याची मागणी केली त्यांनी केली. या दरम्यान ग्राहक बनून आलेल्या दोन्ही महिलांनी दुकानदार व कामगारांची नजर चुकवून पंचवीस हजार रुपये किमतीच्या तीन महाराणी पैठणी चोरून नेल्या.
भामट्या महिलांचा शोध सुरु
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. गुरुवारी 17 मार्च रोजी दुकानांमधील महाराणी पैठणीचा स्टॉक चेक करत असताना तीन महाराणी पैठणी कमी असल्याचं लक्षात आले. यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे यांची तपासणी केली असता या दोन भामट्या महिलांनी महाराणी पैठणीची चोरी केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत येवला तालुका पोलिस ठाण्यात लावल्या पैठणीचे मालक आकाश ठोंबरे यांनी तक्रार दाखल केली असून येवला तालुका पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे या दोन भामट्या महिलांचा शोध घेत आहे.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
अर्धवट जळलेल्या तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकललं! आत्महत्या केल्याचं उघड, का दिला जीव?
चोरांची ही हिंमत? जिंतूरच्या पोलीस ठाण्यातूनच मोटरसायकल उचलली! पोलिसांना खुलं आव्हान
अर्धवट जळलेल्या तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकललं! आत्महत्या केल्याचं उघड, का दिला जीव?