समुद्री शंख, शिंपले, जंगली कंद आणि वन्यजीवांच्या अवयवांची खरेदी-विक्री, येवल्यात अंधश्रद्धा वाढीला, आता वनविभाग अॅक्शन मोडमध्ये
गुड लुक म्हणून अनेक जण जंगली प्राण्यांची अवयव परिधान किंवा तिजोरीत ठेवण्यासाठी लाखो रुपये मोजतात ....असाच काहीसा प्रकार येवला वनविभागाच्या कारवाईतून समोर आला आहे.
नाशिक : गुड लुक म्हणून अनेक जण जंगली प्राण्यांची अवयव परिधान किंवा तिजोरीत ठेवण्यासाठी लाखो रुपये मोजतात ….असाच काहीसा प्रकार येवला वनविभागाच्या कारवाईतून समोर आला आहे. येवला शहरात समुद्री शंख, शिम्पले, जंगली कंद व वन्यजीवांच्या मृगया चिन्हे विकणाऱ्याला येवला वन विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली. योगेश रमेश दाभाडे असं अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. या गुन्ह्याचे धागेदोरे गुजरात व तामिळनाडू राज्यापर्यंत असल्याचे चौकशीतून समोर आले.
समुद्री शंख, शिंपले, जंगली कंद व वन्यजीवांच्या मृगयांची खरेदी -विक्री
समुद्री शंख, शिम्पले, जंगली कंद व वन्यजीवांच्या मृगया चिन्हे अनेकांकडून खरेदी केले जात असल्याने येवल्यात समुद्री शंख, शिंपले, जंगली कंद व वन्यजीवांच्या मृगया चिन्हे विक्री होत असल्याचे गोपनीय माहितीच्या आधारावर गेल्या काही दिवसांपासून येवला वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी येवला शहरात पाळत ठेवून होते.
अचानक येवला-मनमाड रोडवर एक इसम विक्रीसाठी आल्याची गोपनीय माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने सापळा रचून विक्रीसाठी आलेल्या इसमाला ताब्यात घेतले असता हा येवल्यातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. योगेश रमेश दाभाडे असं याचे नाव असून याच्या घराची झाडझडती घेतली असतात समुद्री शंख, शिम्पले, जंगली कंद व वन्यजीवांच्या मृगया चिन्हे मोठ्या संख्येने सापडल्याने याची सखोल चौकशी केली असता या गुन्ह्याचे धागेदोरे गुजरात व तामिळनाडू या राज्यांशी जोडल्याची प्राथमिक माहितीतून समोर आलंय.
वनविभागाची डोकेदुखी वाढली
या साऱ्या प्रकाराने येवला वनविभागाची डोकेदुखी वाढली आहे. अशा गोष्टी खरेदी करणाऱ्यांनी अंधश्रद्धेला बळी पडू नये अन्यथा वन्यजीव कायद्याखाली कारवाईचा थेट इशारा संबंधित गोष्टी खरेदी करणाऱ्यांना येवला वनविभागाने दिला.
सदर कार्यवाही प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनिल लिमये, मुख्य वनसंरक्षक (प्रा.) नाशिक नितिन गुदगे,उपवनसंरक्षक पूर्व भाग नशिक तुषार चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक सुजित नेवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी येवला अक्षय म्हेत्रे, वनक्षेत्रातील वनकर्मचारीमोहन पवार ,प्रसाद पाटील ,पंकज नागपुरे, गोपाल हरगांवकर, सुनिल महाले, नवनाथ बिन्नर हे कारवाईत सहभागी झाले होते.
हे ही वाचा :
मंकावती तीर्थकुंड हडप प्रकरण, फरार आरोपी देवानंद रोचकरी अखेर मंत्रालयाजवळ सापडला
व्हिडीओ गेम पार्लरच्या नावाखाली आकडे लावून जुगार, पुण्यात पाच जणांना अटक