तपास यंत्रणांना जेवढे अधिकार, तेवढ्याच मर्यादाही! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वकील माजिद मेमन यांचा इशारा!

राष्ट्रवादीचे नेते अ‍ॅड माजिद मेमन म्हणाले, आज अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या की, पीएमएलए कायद्यानुसार काम होतंय आणि ईडीचे अधिकारी त्याचा दुरुपयोग करू शकत नाहीत. मला त्यांना सांगायचं आहे की, तुम्ही अर्थमंत्रालय सांभाळताय. गृहमंत्र्यांनी यावर बोलायला हवं.

तपास यंत्रणांना जेवढे अधिकार, तेवढ्याच मर्यादाही! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वकील माजिद मेमन यांचा इशारा!
अॅड. माजिद मेमन, राष्ट्रवादी काँग्रेस नेते
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 2:21 PM

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात ईडीने कारवाई आणि चौकशीचे (ED Enquiry) सत्र सुरु केले आहे. ईडीचे एक पथक आज सकाळीच नवाब मलिक यांच्या घरी धडकले आणि त्यांना चौकशीसाठी कार्यालयात घेऊन गेले. कोणत्याही नोटिशीविना ईडीने केलेली ही कारवाई दडपशाही असल्याची टीका महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेत्यांनी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज सकाळी नवाब मलिक यांना चौकशीसाठी घेऊन गेल्यानंतर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आदी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ वकील माजिद मेमन यांनीही नुकतीच पत्रकार परिषद घेत, केंद्रीय तपास यंत्रणा अशा कारवाईमुळे अडचणीत येऊ शकतात, असा इशारा दिला आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना उद्देशून म्हटले आहे की, तुम्ही एक चांगल्या व्यक्ती आहात, मग तुम्ही

काय म्हणाले अ‍ॅड. माजिद मेमन?

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री न होता महाविकास आघाडीचे सरकार जेव्हापासून आले तेव्हापासून सत्ताधाऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार सुरु असल्याचा आरोप अ‍ॅड. माजिद मेमन यांनी केला आहे. ते म्हणाले, ‘ नरेंद्र मोदी आणि अमित शहांसारखे माणसं काही थांबवू शकले नाही. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले, त्या दिवशीपासून देवेंद्र फडणवीस सरकार पाडण्याची कोणतीही संधी सोडत नाही. आज ना उद्या पाडणार. कायदेशीर, गैरकायदेशीर. कसेही मार्गाने, असे त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या की, पीएमएलए कायद्यानुसार काम होतंय आणि ईडीचे अधिकारी त्याचा दुरुपयोग करू शकत नाहीत. मला त्यांना सांगायचं आहे की, तुम्ही अर्थमंत्रालय सांभाळताय. गृहमंत्र्यांनी यावर बोलायला हवं. मागच्या 7-8 वर्षात विशेषतः 2019 नंतर केंद्रीय तपास यंत्रणांचा जो दुरुपयोग होतोय.. पश्चिम बंगाल निवडणुकांमध्ये केंद्रीय यंत्रणा, पोलिसांचा वापर केला. कुठल्याही प्रकारे ममता बॅनर्जींना पाडायचं, सरकार बनवायचं, हे प्रयत्न विफल झाले. त्यानंतर जिथे कुठे त्यांना इन्कमटॅक्स, ईडी, एनआयए, अशा राष्ट्रीय तपास संस्थांद्वारे राजकीय लाभ कसे मिळवायचे असे प्रयत्न सुरु आहेत. नवाब मलिकांना चौकशीसाठी नेले, हा त्याचाच एक दाखला.’

यंत्रणांना जेवढ्या ‘पॉवर’ तेवढेच ‘चेक’ जास्त- अ‍ॅड. मेमन

अ‍ॅड माजिद मेमन पुढे बोलताना म्हणाले, ‘ कदाचित निर्मलाजींना अंदाज नसेल, मात्र आम्ही केस चालवतो कोर्टात, पीएमएमएमध्ये (Prevention of Money Laundering Act) इतर कायद्यांपेक्षा अधिक अधिकार आहेत, त्यामुळे अधिकाऱ्यांची पॉवर वाढते, त्यामुळे निर्णयावर परिणाम होतो, हे सुप्रीम कोर्टच म्हणतं. अधिकार वाढवल्यामुळे चेक आणि बँलंन्सचा प्रॉम्ब्लेम होतो, सीबीआय ईडीचे अधिकारी कसे वागतात, हे सांगण्याची मला गरज नाही. शरद पवारांच्या बाबतीतही त्यांनी असंच केलं आहे, तासनतास बसवायचं, पुरावे कसेही तयार करायचे, नंतर बघू आम्ही आणि हराशमेंट करण्याचे अधिकार या अधिकाऱ्यांना असतात. अशा गुन्ह्यामध्ये कोर्टाचे आदेश असे आहेत, की तपास करताना तपास यंत्रणांना सगळे अधिकार दिले जातात. मात् तेवढ्या मर्यादाही असतात. त्यामुळे हे सगळं आम्ही कोर्टात बघून घेऊ, असा इशारा अ‍ॅड. माजिद मेमन यांनी दिला.

इतर बातम्या-

एका चुकीची शिक्षा 18 लाख गरिबांना?, नागपुरात वेळेत उचल न केल्याने जानेवारीचे मोफत रेशन नाही

Ashish Shelar on Nawab Malik | ‘पवारसाहेब मोठे नेते, त्यांना आम्ही काय सांगणार! पण…’

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.