देवेंद्र फडणवीस यांना सध्या विपश्यना करण्याची गरज; संजय राऊत यांचा खोचक टोला

Sanjay Raut on Devendra Fadnavis : संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. तसंच भाजपवरही जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना सध्या विपश्यना करण्याची गरज आहे, असं संजय राऊत म्हणालेत. इंडिया आघाडीच्या बैठकीवर राऊत काय म्हणाले? वाचा सविस्तर...

देवेंद्र फडणवीस यांना सध्या विपश्यना करण्याची गरज; संजय राऊत यांचा खोचक टोला
Follow us
| Updated on: Dec 18, 2023 | 10:30 AM

प्रदिप कापसे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 18 डिसेंबर 2023 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांना सध्या विपश्यना करण्याची गरज आहे, असं संजय राऊत म्हणालेत. देवेंद्र फडणवीसांना दोन ज्युनिअरच्या हाताखाली काम करावं लागतंय. राज्याचा कारभार दिल्लीतून सुरू आहे. महाराष्ट्र दिल्लीचं पायपुसनं झालं आहे, अस आम्ही त्यामुळेच म्हणत आहोत. मुंबईचा सौदा सुरू आहे आणि तो शिवसेना होऊ देणार नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर घणाघात केला आहे. राजधानी दिल्लीत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी ही टीका केली आहे.

उद्या इंडिया आघाडीची बैठक

इंडिया आघाडीची उद्या दिल्लीत दुपारी 3 वाजता बैठक होत आहे. या बैठकीसाठी सगळ्या घटकपक्षांना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी निमंत्रण दिलं आहे. सगळे प्रमुख नेते या बैठकीला येणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा एक पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. पण माझी माहिती आहे की ते इंडियाची ही बैठक आटोपून पुढे जाणार आहेत. उद्धव ठाकरे आज रात्री दिल्लीत येत आहेत. उद्या बैठक आणि महत्वाच्या भेटीगाठी आहेत. उद्या ते बैठकी आधी उद्धव ठाकरे केजरीवाल यांची भेट घेणार आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

हेमंत सोरेन हे देखील बैठकीला येणार आहेत. जर येता आले नाही तर ते झूम द्वारे सहभागी होतील. 2024 च्या दृष्टीने ही बैठक महत्वाची आहे. फक्त चर्चा नाही तर अनेक निर्णय बैठकीत घेतले जातील. लोकशाहीचं रक्षण करणं हा बैठकीच प्रमुख अजेंडा असेल. जागावाटपाबाबत देखील चर्चा होईल, असं राऊतांनी सांगितलं आहे.

संभाजीराजे यांच्यासोबत काय चर्चा?

संभाजीराजे यांचा मला फोन आला होता. पण उद्धव ठाकरे येत असल्याने मला त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांनी बोलावलेल्या बैठकी बाबत आमची सकारात्मकता आहे. जर मला वेळ काढता आला तर मी स्वतः किंवा शिवसेनेचा मोठा नेता उपस्थित राहील, असंही राऊतांनी सांगितलं आहे.

“अशी भाषा सर्वांनी टाळावी”

एकमेकांवर खालच्या भाषेत बोलणं सर्वांनीच टाळलं पाहिजे. छगन भुजबळ हे मोठा समाजाचे नेते आहेत. मनोज जरांगे पाटील हे देखील मोठ्या समाजाचं नेतृत्व करत आहेत. राज्याचं वातावरण खराब होणार नाही याची काळजी घ्यावी, असं राऊतांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...