राष्ट्रपतींच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी मराठा आरक्षणासाठी पर्याय सुचवला; म्हणाले…

Sanjay Raut on Maratha Reservation After Meeting with President Daupadi Murmu राष्ट्रपतींच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी मराठा आरक्षणासाठी पर्याय सुचवला... संजय राऊत नेमकं काय म्हणाले? पाहा...

राष्ट्रपतींच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी मराठा आरक्षणासाठी पर्याय सुचवला; म्हणाले...
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 1:49 PM

संदीप राजगोळकर, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 18 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या पेटला आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. अशात ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने पावलं उचलावीत, असं संजय राऊत म्हणाले. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल आणि कुणावरही अन्याय करायचा नसेल तर केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करत आरक्षणाचा कोटा वाढवावा, असा पर्याय संजय राऊत यांनी सुचवला आहे.

राष्ट्रपतींशी काय चर्चा?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना आमचं शिष्टमंडळ भेटून आलं. राज्यातील सध्याची चिंताजनक परिस्थितीबाबत आम्ही राष्ट्रपतींची भेट घेतली. महाराष्ट्राने अनेक संकट झेलली आहेत. पण अशी परिस्थिती महाराष्ट्राने कधीच नव्हती. हे सगळं राष्ट्रपतींच्या कानावर घातलं. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही आम्हाला आश्वस्त केलं आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

सरकारमधील मंत्री जाहीर सभेतून एकमेकांना आव्हान देत आहेत. त्यामुळे एक सर्वसमावेशक भूमिका घेऊन आम्ही भेट घेतली. इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता त्यांना सामावून घेताना घटनेत तरतूद करून घ्यावी. हे सगळ संसद आणि केंद्र सरकारच्या हातात आहे. येत्या अधिवेशनात विशेष प्रस्ताव आणून तो या सोडवावा अशी मागणी केली. राष्ट्रपती मुर्मू यांनीही आम्हाला याबाबात आश्वासन दिलं आहे. या विषयात लक्ष घालून तोडगा काढण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली, असं संजय राऊत म्हणालेत.

राज्य सरकारने ‘हे’ करावं- राऊत

राज्यात शांतता राहावी, महाराष्ट्र दुभंगला जाऊ नये, ही आमची भूमिका आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवायची असेल तर ती संसदेत त्यावर चर्चा करावी लागेल. घटना दुरुस्ती करावी लागेल. मग हे राज्यात काय करणार आहेत? कायद्याच्या चौकटीत आरक्षण दिलं नाही. तर टिकत नाही हे हरियाणातील प्रकरणावरून दिसून आलं आहे. येत्या अधिवेशनात सर्वसमावेशक आरक्षण द्यावं. 8 तारखेला मुख्यमंत्री बोलतील ते स्वगत असेल असं वाटतं. सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्रात आणायचं काम राज्य सरकारने करावं, असंही राऊत यावेळी म्हणाले.

“सरकारने घटना दुरुस्ती करावी”

राज्य सरकार घटनाबाह्य असलं तरी त्यांनी घटना दुरुस्ती करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना विषय माहीत नाही का? ते राज्यात आले तेव्हा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. त्यामुळे केंद्र सरकारने या प्रश्न लक्ष घालावं. आरक्षणाची मर्यादा वाढवावी, असं संजय राऊत म्हणालेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.