AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navi Mumbai | स्टेशनजवळ सापडला 15 फूट अजगर, नागरिकांची उडाली घाबरगुंडी

स्टेशन परिसरात हा अनाहूत पाहूणा सापडल्याने लोकांची घाबरगुंडी उडाली होती. तत्काळ सर्पमित्रांना बोलावण्यात आले. त्यांनी या अजगराला ताब्यात घेतले. त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात येईल, असे सर्पमित्र संघटनेच्या एका कार्यकर्त्याने सांगितले.

Navi Mumbai | स्टेशनजवळ सापडला 15 फूट अजगर, नागरिकांची उडाली घाबरगुंडी
| Updated on: Oct 13, 2023 | 1:27 PM
Share

नवी मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : काही दिवसांपूर्वी दादारमधील एका स्वीमिंग पूलमध्ये मगरीचं पिल्लू आढळल्यानने एकच खळबळ उडाली होती. लिकेच्या महात्मा गांधी स्विमींग पूलमध्ये मगरीचं एक छोटं पिल्लू (baby crocodile) सापडल्याने गोंधळा उडाला. ही घटना अद्याप ताजी असतानाच नवी मुंबईतही एक अनाहूत पाहुणा सापडल्याने घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं.

नवी मुंबईच्या जुईनगर रेल्वे स्टेशन परिसरात अनेक लोक सकाळी कामाला जाण्यासाठी, ट्रेन पकडण्यासाठी धावत होते. मात्र तेवढ्यात स्टेशन परिसरात एका भल्यामोठ्या अजगराने (python) दर्शन दिले. जुईनगर रेल्वे स्टेशनच्या भागात एका ठिकाणी तब्बल 15 फूट लांब अजगर लपून बसल्याचे आढळले. हा अजस्त्र अजगर पाहून तेथील नागरिकांच्या तोंडचं पाणीच पळालं. तिथे एकच घाबरगुंडी उडाली.

अनेक जण तो अजगर पाहण्यासाठी गर्दी करत होते. मात्र काही नागरिकांनी सतर्कता दाखव प्राणीमित्र संघटनेला फोन करून बोलावले. सर्पमित्र तिथे तत्काळ दाखल झाले आणि त्यांनी अजगराला रेस्क्यू करत ते सुरक्षितपणे त्याला घेऊन गेले.

स्विमींग टँकमध्ये सापडलं मगरीचं पिल्लू

काही दिवसांपूर्वीच दादरच्या शिवाजी पार्क एरिआत असलेल्या महापालिकेच्या महात्मा गांधी स्विमींग पूलमध्ये मगरीचं एक छोटं पिल्लू आढळल्याने एकच गोंधळ माजला होता. पहाटेच्या सुमारास हे २ फुटी पिल्लू तलावातील पाण्यात मजेत पोहत होतं. मात्र हे दृष्य पाहून बाकीचे सर्व चांगलेच घाबरले. याबाबत स्वीमिंग पूल आणि थिएटरचे को-ऑर्डिनेचर संदीप वैशंपायन यांनी अधिक माहिती गिली. हा स्वीमिंग पूल रोज सकाळी मेंबर्ससाठी खुला करण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांकडून त्याची बारकाईने पाहणी केली जाते, तसेच सफाईही होते. नेहमीप्रमाणे पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास स्वीमिंग पूलची पाहणी केली असता, कर्मचाऱ्यांना पाण्यामध्ये मगरीचं एक छोटं पिल्लू आढळलं, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर तज्ज्ञांच्या मदतीने तातडीने कारवाई करत या पिल्लाला सुखरूप पकडण्यात आले. हे पिल्लू वनविभागाच्या ताब्यात देण्यासाठी आवश्यक कार्यवाही देखील करण्यात आली.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.