नवी मुंबई पोलीस दलातील 514 कर्मचार्यांच्या बदल्या
नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांच्या आदेशानुसार 514 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांच्या आदेशानुसार 514 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात होणाऱ्या पोलिसांच्या बदल्या रखडल्या होत्या (Navi Mumbai 514 Police Transfers).
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात पाच हजारांहून अधिक पोलीसबळ आहे. एका जागेवर सहा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर प्रशासकीय बदल्या करण्यात येतात. दरवर्षी मे महिन्यात पार पाडली जाणारी ही प्रक्रिया लॉकडाऊन लागू असल्यामुळे गृह विभागाकडून स्थगित करण्यात आली होती. मात्र, नव्या आयुक्तांनी कार्यभार सांभाळल्यानंतर दोन दिवसांमध्ये ही प्रकिया मार्गी लावली आहे.
सुरुवातीस एकूण 531 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार होत्या. मात्र, त्यातील 15 जणांच्या बदल्या विविध कारणांसाठी स्थगित करण्यात आल्या आहेत. एकूण 514 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पोलीस शिपाई, नाईक, हवालदार आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.
मोबाईल शोरुम फोडणारी टोळी गजाआड, नवी मुंबई पोलिसांकडून तिघांना अटक, 45 लाखांचा मुद्देमाल जप्तhttps://t.co/MEkgUfUoqV
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 8, 2020
Navi Mumbai 514 Police Transfers
संबंधित बातम्या :
बिलासाठी फोर्टिस रुग्णालयाचा आडमुठेपणा, नवी मुंबईतील नामांकित डॉक्टरचा मृतदेह देण्यास नकार