श्रावण महिन्यासह पावसाळी आजारांमुळे फळांची मागणी वाढली; बाजारभाव मात्र आवाक्यात

आज मार्केटमध्ये 250 गाड्यांची आवक झाली. डेंग्यू आजारामुळे ड्रॅगन फळाला चांगली मागणी असते. या फळाचा आजचा दर 25 ते 30 प्रतिनग असा आहे. शिवाय किवी, पपई, मोसंबी, सफरचंद आणि सीताफळाची आवकही वाढली आहे. श्रावणामुळेही ग्राहकांकडून फळांना पसंती दिली जात आहे.

श्रावण महिन्यासह पावसाळी आजारांमुळे फळांची मागणी वाढली; बाजारभाव मात्र आवाक्यात
नवी मुंबई एपीएमसी मार्केट
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 9:09 PM

नवी मुंबई : पावसाळी आजारांसह मलेरिया, डेंग्यू असे आजार शहरात वाढू लागले आहेत. नागरिक रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे साधा आणि घरचा आहार घेण्याला लोक प्राधान्य देत असल्याचं पाहायला मिळतंय. शिवाय भाज्या आणि फलोहाराला पसंती दिली जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी फळांना चांगलीच मागणी असते. श्रावण महिन्यात अनेक लोक शाकाहाराला पसंती देतात. शिवाय या महिन्यात रक्षाबंधन, कृष्णजन्माष्टमी असे उत्सव येतात. त्यामुळे बहुतेक लोकांना उपवास असतो. परिणामी फळांचे बाजारभाव गगनाला भिडतात. परंतू यावर्षी मात्र फळांचे बाजारभाव ग्राहकांच्या आवाक्यात राहिल्याचे पाहायला मिळत आहे. (Demand for fruits increased in Navi Mumbai APMC market)

आज मार्केटमध्ये 250 गाड्यांची आवक झाली. डेंग्यू आजारामुळे ड्रॅगन फळाला चांगली मागणी असते. या फळाचा आजचा दर 25 ते 30 प्रतिनग असा आहे. शिवाय किवी, पपई, मोसंबी, सफरचंद आणि सीताफळाची आवकही वाढली आहे. श्रावणामुळेही ग्राहकांकडून फळांना पसंती दिली जात आहे. सफरचंदचा हंगाम जोमात असून आवक वाढल्याने त्याची किंमत प्रती किलो 80 ते 100 वरून 60 ते 80 रुपयांवर आली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून डेंग्यू आणि मलेरियाचे संशयित रुग्ण आढळू लागले आहेत. या आजारात रुग्णांच्या प्लेटलेट्स कमी होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे डॉक्टर किवी, ड्रॅगन फ्रूट आणि पपई खाण्याचा सल्ला देत असतात. त्यामुळे या फळांना मागणी वाढली असल्याचं व्यापारी हरेश वसनदानी यांनी सांगितलं.

मुंबई एपीएमसी मार्केटमधील आजचे फळांचे बाजारभाव

ड्रॅगन फ्रूट – 25 ते 30 रुपये प्रती नग किवी – 10 रुपये प्रती नग पपई – 20 रुपये प्रति नग सफरचंद – 60 ते 80 रु. प्रति किलो डाळिंब – 50 ते 120 रु. प्रति किलो पेर – 50 ते 100 रुपये किलो

पोलिसांकडून चोरी गेलेल्या 1 कोटी रुपयांच्या वस्तू नागरिकांना परत

नवी मुंबई पोलिसांतर्फे नवी मुंबईतील नागरिकांना जवळपास 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ 1 वाशी मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम वाशी साहित्य मंदिर येथे पार पडला. या कार्यक्रमात जवळपास 50 लोकांना दागिने, वस्तू, ऑटो रिक्षा, कार आणि कॅमेरे अशा वस्तू परत करण्यात आल्या. चोरी आणि दरोडे प्रकरणात तक्रार असलेल्या नागरिकांना हा मुद्देमाल परत करण्यात आला आहे. मुद्देमाल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले आहेत.

अशा गुन्ह्यांमध्ये 40 ते 50 टक्के मुद्देमाल हस्तगत होता. गुन्हेगारांच्या अटकेपासून ते मुद्देमाल हस्तगत करणे ही सोपी प्रक्रिया नाही. तरी पोलीस 100 टक्के मुद्देमाल जप्त करण्याचा प्रयत्न करतात. तरी पोलिसांनी केलेल्या कामाचे आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच लोकांनी अधिक काळजी घ्यावी अशी विनंतीही केली आहे. तसेच, अशा घटना घडल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

इतर बातम्या :

Weather Update : पालघरला रेड ॲलर्ट, मुंबईसह कोकण ते उत्तर महाराष्ट्रात मुसळधार, IMD कडून नवा अंदाज जारी

तुम्ही नादच केलाय थेटsss, ना IIT, ना ‘मोठी’ डीग्री, कोल्हापूरच्या अमृताला 41 लाखांचं पॅकेज!

Demand for fruits increased in Navi Mumbai APMC market

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.