Navi Mumbai Corona | नवी मुंबईत ‘कोरोना’चं थैमान सुरुच, रुग्ण संख्या 1,364 वर

नवी मुंबईतही कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत चालले आहेत. सध्या नवी मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 364 वर पोहोचली आहे.

Navi Mumbai Corona | नवी मुंबईत 'कोरोना'चं थैमान सुरुच, रुग्ण संख्या 1,364 वर
Follow us
| Updated on: May 21, 2020 | 5:19 PM

नवी मुंबई : राज्यात कोरोनाचं थैमान घातलं आहे (Navi Mumbai Corona Virus ). नवी मुंबईतही कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत चालले आहेत. सध्या नवी मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 364 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत नवी मुंबईत 45 जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Navi Mumbai Corona Virus ) झाला आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे 90 ठिकाणं कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. तर महापालिकेने पाचही मार्केट कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरु असणार आहेत. एपीएमसी मार्केटच्या व्यपारी आणि त्यांच्या संपर्कामुळे 505 जणांना कोरोनाची लागण झाली, तर 7 जणांना मृत्यू झाला.

नवी मुंबई एपीएमसीततील धान्य, मसाला, फळे, भाजीपलाआणि कांदा बटाटा मार्केट बाजारपेठ सुरु करण्यात आली आहे. मात्र, एपीएमसी मार्केटच्या पाचही बाजारात प्रवेश करणाऱ्या घटकांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये सध्या 166 भाजीपाला गाड्यांची आवक सुरु आहे.

मुंबई एपीएमसी आणि विविध चेकनाक्यांवरुन 616 भाजीपाला गाड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत.

– एपीएमसी फळ मार्केटमध्ये 255 गाड्याची आवक

– एपीएमसी मसाला मार्केटमध्ये 80 गाड्याची आवक

– एपीएमसी धान्य मार्केटमध्ये 180 गाड्याची आवक

– एपीएमसी मार्केटमध्ये 80 कांदा बटाटा गाड्याची आवक

नवी मुंबई पोलिसांतर्फे शहरात विविध ठिकाणी कडकडीत नाकाबंदी करण्यात आली आहे. नवी मुंबईत कोरोना रुग्णाची संख्या वाढल्याने आयुक्तांच्या चिंतेत वाढ झाली आहे. एपीएमसी मार्केटचे सर्व व्यवहार ऑनलाईन करा, असे आदेश महापालिका आयुक्तांनी एपीएमसी प्रशासनाला दिले आहेत (Navi Mumbai Corona Virus). तरीही एपीएमसी प्रशासनकडून मात्र ऑफलाईन कामकाज सुरु आहे.

नवी मुंबई मधील आठही विभाग रेड झोनमध्ये

नवी मुंबई मधील आठही विभाग रेड झोनमध्ये आहेत. त्यातील तुर्भे, कोपरखेरणे, नेरुळ, घणसोली आणि एपीएमसी मार्केट हे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 39 हजारांच्या पार

राज्यात काल (20 मे) दिवसभरात तब्बल 2 हजार 250 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 39 हजार 297 वर पोहोचला आहे. राज्यात काल 697 रुग्णांनी करोनावर मात केली. आतापर्यंत 10 हजार 318 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या सर्व रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर राज्यात कोरोनामुळे काल दिवसभरात 65 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 1,390 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Navi Mumbai Corona Virus

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांसाठी वर्धा जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम, कृषी कर्जाच्या कागदपत्रांची फरफट थांबणार

Solapur Corona | सोलापुरात कोरोनाचा विळखा घट्ट, बाधितांचा आकडा 470 वर

राज्यात कोरोनाचा कहर, दिवसभरात 2250 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 39 हजार पार

Akola Corona | अकोल्यात रुग्णांची संख्या 299 वर, 90 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणंच नाही

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....