Navi Mumbai | युक्रेनमध्ये अडकलेला नेरूळचा विद्यार्थी मायदेशी पोहोचला सुखरूप
युक्रेनमध्ये (Ukraine) युद्धजन्य (War) परिस्थिती असताना तिथे असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल पाहायला मिळाले. अशा स्थितीतून अभिजित अशोक थोरात हा विद्यार्थी सुखरूप आपल्या नेरूळ येथील (Nerul) घरी पोहोचला आहे.
युक्रेनमध्ये (Ukraine) युद्धजन्य (War) परिस्थिती असताना तिथे असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल पाहायला मिळाले. अशा स्थितीतून अभिजित अशोक थोरात हा विद्यार्थी सुखरूप आपल्या नेरूळ येथील (Nerul) घरी पोहोचला आहे. या निमित्ताने स्थानिक माजी नगरसेविका सलुजा संदिप सुतार यांनी थोरात कुटुंबाची भेट घेतली. अभिजित अशोक थोरात याच्याशी युक्रेन देशातील परिस्थिती आणि एकूणच आढावा घेतला. त्याचे स्वागत करण्यात आले आहे. युक्रेनमध्ये अडकलेला विद्यार्थी नवी मुंबईत परतला आहे. सर्वांचे त्याने आभार मानले आहे. अजूनही काही विद्यार्थी तिथे अडकले आहेत. केंद्र सरकारच्या ऑपरेशन गंगा अंतर्गत या विद्यार्थ्यांना परत मायदेशी आणले जात आहे. युक्रेनमधून बाहेर पडून तात्पुरते शेजारी देशात जाण्याचा सल्लाही केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांना दिला होता. दरम्यान याअंतर्गत अभिजित थोरात आता मायदेशी आला आहे.