नवी मुंबईतील इतिहासाचा साक्षीदार असलेली वास्तू कोसळली, बेलापूर किल्ल्याचा बुरुज ढासळला
मुंबई महापालिकेसमोर असलेल्या बेलापूरच्या किल्ल्याचा टेहळणी बुरुज ढासळला. त्यावेळी परिसरात कुणी उपस्थित नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
नवी मुंबई : पनवेल आणि नवी मुंबई परिसरात शनिवार सकाळपासून रिमझिम पाऊस बरसत आहे. पावसामुळे नवी मुंबई शहरातील इतिहासाची साक्षीदार असलेली वास्तू ढासळली आहे. बेलापूर किल्ल्याचा बुरुज ढासळलाय. जोरदार पावसामुळे नवी मुंबई महानगरपालिके समोरील किल्ल्याचा बुरुज ढासळला आहे. हा ढासळलेली बाजू हा बेलापूरच्या किल्ल्याचा टेहळणी बुरुज होता. हा किल्ला पोर्तुगिजांकडून चिमाजी आप्पा यांनी ताब्यात घेतला होता. या बुरुजावरुन शत्रूवर नजर ठेवण्याचं काम केलं जायचं. (The bastion of Belapur fort in Navi Mumbai collapsed)
नवी मुंबईत सातत्याने जोरदार पाऊस बसरतोय. या नवी मुंबई महापालिकेसमोर असलेल्या बेलापूरच्या किल्ल्याचा टेहळणी बुरुज ढासळला. त्यावेळी परिसरात कुणी उपस्थित नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. हा किल्ला थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी पोर्तुगिजांकडून ताब्यात मिळवला होता. आज ढासळलेल्या बुरुजावरुन शत्रूवर नजर ठेवण्याचं काम केलं जायचं.
बेलापूर किल्ल्याचा इतिहास
1733 मध्ये चिमाजी अप्पाच्या नेतृत्वात मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून किल्ल्यावरील ताबा मिळविला. पोर्तुगीजांकडून यशस्वीरित्या किल्ला पुन्हा ताब्यात घेण्यात आल्यास त्यांनी जवळच्या अमृतैश्वर मंदिरात बेलीच्या पानांचा हार घालेल असा प्रण केला आणि विजय मिळाल्यावर त्यांनी किल्ल्याला बेलापूर किल्ला असे नामकरण केले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन चार्ल्स ग्रेन याने 23 जून 1817 रोजी ताब्यात घेईपर्यंत मराठ्यांनी या प्रदेशावर राज्य केले. ब्रिटीशांनी त्यांच्या परिसरातील कुठलाही मराठ्यांच्या वर्चस्वाखाली असलेला गड मोडून काढण्याच्या धोरणाखाली हा किल्ला अर्धवट नष्ट केला.
रायगड, नवी मुंबई परिसरात अतिवृष्टीचा धोका टळला
रायगड आणि नवी मुंबई परिसराला असलेला अतिवृष्टीचा धोका टळला आहे. कारण, पनवेल आणि नवी मुंबई परिसरात शनिवार सकाळपासून रिमझिम पाऊस बरसत आहे. तर रायगडमध्येही तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसत आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 34 मिमी इतका पाऊस झाला आहे. तर पनवेलमध्ये 29.30 मिमी आणि नवी मुंबईत पावसाची सरासरी 45 मिमी इतकी आहे.
हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे 10 आणि 11 जूनला नवी मुंबईत अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. तर रायगडमध्येही 10 आणि 11 जूनला वेगाने वारे वाहतील, असा इशारा देण्यात आला होता. या दोन दिवसांमध्ये नवी मुंबई आणि रायगडमध्ये 200 मिमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले होते.
ठाण्यात सतर्कतेचा इशारा
सलग दोन ते तीन दिवस पावसाने मोठ्या प्रमाणात ठाणे शहरात देखील हजेरी लावली आहे. तसेच ते येत्या तीन ते चार दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे.
संबंधित बातम्या :
Mumbai Rains : झोडपणे सुरूच … पावसामुळे मुंबईतील रस्ते पाण्यात, पाहा फोटो!
Mumbai Rains: मुंबईत समुद्राला उधाण, ढगांचा गडगडाट, धो-धो पावसाला सुरुवात
The bastion of Belapur fort in Navi Mumbai collapsed