AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये वृद्ध शेतकऱ्याची फसवणूक; न्यायासाठी हेलपाटे सुरूच

एकीकडे शेतकऱ्याला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. शिवाय देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. असाच एक हतबल शेतकरी आज (13 जुलै) नवी मुंबईत हैराण झाला आहे.

मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये वृद्ध शेतकऱ्याची फसवणूक; न्यायासाठी हेलपाटे सुरूच
| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 6:30 PM
Share

नवी मुंबई : एकीकडे शेतकऱ्याला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. शिवाय देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. असाच एक हतबल शेतकरी आज (13 जुलै) नवी मुंबईत हैराण झाला आहे. गेल्या दोन वर्षात 10 वेळा नाशिकहून मुंबईवारी करून सुद्धा या वृद्धाला न्याय मिळत नसल्याचे समोर आले आहे. मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमधील व्यापाऱ्याने वृद्ध शेतकऱ्याची फसवणूक केल्याने या वृद्ध शेतकऱ्याच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोमनाथ गणपत सानप असं या 65 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचं नाव आहे. हे शेतकरी भाजीपाला व्यापाऱ्याकडे हेलपाटे घालून थकले आहे. शिवाय हा शेतकरी आपल्यापेक्षा वयाने कमी असलेल्या बाजार समिती सभापतींना हाथ जोडून न्याय मिळवून देण्याची विनवणी करत आहे.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील वडगाव पिंगळा येथील सानप बाबांनी मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमधील इ पाकळीमधील गाळा क्रमांक 836 या गाळ्यावर 2 वर्षांपूर्वी कोबी हा शेतमाल पाठवला होता. या मालाचे 5 लाख 75 हजार रुपये झाले, मात्र ते अद्याप त्यांना मिळालेच नाहीत. या ठिकाणी एस. एस. के. अँड कंपनी नावाने व्यापार करणारा व्यापारी मधुकर सुदाम डावखर याने त्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांनी केलाय. मे 2019 मध्ये 2 लाख रुपयाचा धनादेश या व्यापाऱ्याने राजाराम कराड नावे दिला होता. तो सुद्धा वटला न गेल्याने सानप बाबा खुपच चिंताग्रस्त झाले.

“शेतकऱ्याचे सुनावणीसाठी हेलपाटे, रात्रीपासून उपाशी बाबांना व्यापाऱ्यांनी नाष्टा दिला”

याबाबत सानप बाबांनी डिसेंबर 2019 मध्ये बाजार समिती अध्यक्ष आणि सचिवांना अर्ज केला होता. या अर्जवर बाजार समिती प्रशासनाने 29 जून 2021 मध्ये सानप बाबांना सुनावणीसाठी पत्र पाठवले. त्यानुसार 12 जुलै रोजी शेतमालाच्या गाडीत रात्री बसून सानप पहाटे भाजीपाला मार्केटमध्ये पोहचले. तर सुनावणी वेळ सकाळी 11 वाजताची असल्याने रात्रीपासून काही न खालेल्या बाबांना काही व्यापाऱ्यांनी नाष्टा दिला. याची खात्री बाबांना नसल्याने कसेबसे दोन घास पोटात बाबांनी घातले आणि सुनावणीला गेले.

“शेतकऱ्याची फसवणूक करणारा व्यापारी गाळा विकून फरार”

यावेळी भाजीपाला मार्केट उपसचिव सुनील सिंगटकर यांनी सांगितले की या व्यापाऱ्याने गाळा विकला आहे. आम्ही त्याला ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही. शिवाय जोपर्यंत या शेतकऱ्याचे पैसे देणार नाही, तोपर्यंत ना हरकत प्रमाणपत्र दिले जाणार नाही. शिवाय प्रशासनाने दिलेल्या वेळेत शेतकऱ्याचे पैसे न दिल्यास गाळा निलाव करून शेतकऱ्याचे पैसे देण्यात येईल.

“शेतकऱ्याच्या जीवावर व्यापारी चारचाकी गाडीत, बळीराजाची हालअपेष्टा कायम”

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अनेक व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असते. अनेक अशिक्षित शेतकऱ्यांना तक्रार प्रक्रिया माहित नसल्याने कित्येक शेतकऱ्यांचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. जवळपास सर्वच व्यापारी शेतकऱ्याच्या जीवावर भव्य चारचाकी गाडी घेऊन फिरतात. मात्र, काबाडकष्ट करून शेतमाल पिकवणाऱ्या शेतकऱ्याला शेतमालाच्या गाडीत अथवा सरकारी गाडीने दयनीय अवस्थेत बाजारात येऊन निराशा पदरी घेऊन जावे लागते. त्यामुळे बाजार समिती ही नक्की शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांसाठी असा सवाल केला जात आहे. संबंधित पत्ता दिलेल्या गाळ्यावर डावखर नावाचा व्यापारी भेटत नसून त्याचा फोन देखील बंद आहे. तर त्या जागेवर दुसराच व्यक्ती व्यापार करत असल्याने शेतकऱ्याने काय करावे? असा प्रश्न तयार झालाय.

“शेतकऱ्यांना पैसे न देता पळ काढणाऱ्या व्यक्तीचा शोध कसा लागणार?”

भाजीपाला मार्केटमध्ये एकूण ए.सी.डी आणि इ अशा 4 पाकळ्या आहेत. यातील डी पाकळीमध्ये जवळपास सर्वच व्यापारी भाडेतत्वावर व्यापार करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी असलेले गाळा मालक इ पाकळीत जाऊन व्यापार करतात. त्यामुळे त्या ठिकाणी गाळा मालक वेगळा व्यापार करणारा वेगळा अशावेळी शेतकऱ्यांना पैसे न देता पळ काढणाऱ्या व्यक्तीचा शोध कसा लागणार अथवा तो लावण्यासाठी बाजार समिती प्रशासनाला किती अथक प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे बाजार समितीने गाळा मालकानेच गाळ्यावर व्यापार करणे बंधनकारक असेल असे निर्देश जारी करावेत. त्यामुळे शेतकऱ्याला त्याचे पैसे मिळणे अथवा बाजार समितीला मिळवून देणे सोयीचे राहील.

हेही वाचा :

केंद्र सरकारने लागू केलेला डाळीवरील कायदा रद्द करा, नवी मुंबईतील APMC मार्केटमधील मसाला आणि धान्य व्यापारांकडून बंदची हाक

मुंबई APMC फळ बाजारात स्फोट झाला तेव्हा सीसीटीव्ही बंद, बेजबाबदारपणा की षडयंत्र?

मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमध्ये हजारो जीव धोक्यात, मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष

व्हिडीओ पाहा :

Cheating with Farmer of Nashik in APMC Navi Mumbai

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.