Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… तर धनंजय मुंडेंना शिक्षा व्हावी, चित्रा वाघ आक्रमक

संबंधित मुलीनं केलेल्या आरोपामध्ये काही जर तथ्य असेल आणि धनंजय मुंडे दोषी आढळले तर नियमाप्रमाणं शिक्षा व्हावी, असं चित्रा वाघ म्हणाल्या.(Chitra Wagh Dhananjay Munde )

... तर धनंजय मुंडेंना शिक्षा व्हावी, चित्रा वाघ आक्रमक
चित्रा वाघ, भाजप नेत्या
Follow us
| Updated on: Jan 13, 2021 | 5:22 PM

मुंबई: भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवरील आरोप आणि महिला अत्याचारांच्या घटनांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. चित्रा वाघ यांनी एखाद्या महिलेने कॅबिनेट मंत्र्यावर आरोप करते हे गंभीर आणि धक्कादायक आहे. राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी चौकशी करावी, असं आवाहन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी कोणत्याही दबावाला बळी न पडता  तपास केला पाहिजे, असं चित्रा वाघ म्हणाल्या. मुलीनं केलेल्या आरोपामध्ये काही जर तथ्य असेल आणि धनंजय मुंडे दोषी आढळले तर नियमाप्रमाणं शिक्षा व्हावी, असंही त्या म्हणाल्या. (Chitra Wagh said Police should investigate Dhananjay Munde case without any pressure)

महाराष्ट्रात एका दिवसात सामूहिक बलात्काराच्या तीन घटना घडतात. महाराष्ट्र कुठे चालला आहे. औरंगाबाद आणि माहिमच्या केसमध्ये गुन्हा दाखल होऊनही सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. सत्ताधारी पक्षाच्या महिला अत्याचारांचा आरोप असणाऱ्या आरोपींना अटक केली नाही, त्यामुळे महिलांवर अत्याचार करण्याचं मनोबल वाढत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला. पोलीस आणि सरकराची महिलांबद्दलची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत राज्यातील महिला आणि लेकीबाळी सुरक्षित राहणार नाहीत, असं भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या.

पोलिसांनी सत्य बाहेर आणावं: देवेंद्र फडणवीस

“धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी. धनंजय मुंडे यांनी स्वत: कबुली दिली आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू”, अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी मांडली आहे

सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा. @TV9Marathi वर

“धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपल्या संबंधांची कबुली दिली आहे. नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षाने त्या कबुलीच्या संदर्भात विचार करण्याती आवश्यकता आहे. त्यातील जी कायदेशीर बाब आहे, धनंजय मुंडे आणि तक्रारदार तरुणी दोघांनी मांडली आहे, धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी कोर्टात गेल्याचं सांगितलं आहे. असं संशयाचं वातावरणं राहणं योग्य नाही. त्यामुळे तात्काळ पोलिसांनी या संदरंभातील सत्य बाहेर आणावं. पोलिसांनी एकदा सत्य बाहेर आलं की, आम्ही आमची मागणी करु”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या:

‘सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही’, धनंजय मुंडे प्रकरणावर जयंत पाटलांची भूमिका

नैतिकता महत्त्वाची, धनंजय मुंडे प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य

 (Chitra Wagh said Police should investigate Dhananjay Munde case without any pressure)

कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.