CIDCO Lottery : 1000/- स्टॅम्प ड्युटी भरलेली, आता 18,000/- आणखी द्यावे लागणार! कारण काय?
Cidco Home Buyers : कमी भरण्यात आलेल्या स्टॅम्प ड्युटीवर तातडीनं एका महिन्याच्या आत खुलासा करावा किंवा मग उरलेली रक्कत भरावी, अशा सूचना लोकांना नोटीसद्वारे देण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई : सिडको लॉटरीमध्ये (Cidco Lottery) घर लागलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सिडकोचं घर लागलेल्यांना एक हजार रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीवर (Stamp Duty) घर मिळलं खरं. पण आता या सगळ्यांना स्टॅम्प ड्युटीसाठी 18 हजार रुपये आणखी द्यावे लागणार आहे. पनवेल कार्यालयानं तशा नोटिसा लॉटरीमध्ये घर लागलेल्यांना पाठवलेल्या आहेत. त्यामुळे सिडकोच्या लॉटरीतील भाग्यवंताना मुद्राक विभागाकडून ‘दे धक्का’ मिळालाय. सिडको लॉटरीत पंतप्रधान आवास (PMAY) योजनेत मिळालेल्यांना मुद्रांक शुल्क विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली. या नोटीसनुसार आता 18 हजारांची अतिरीक्त रक्त मुद्राक शुल्क विभागाला अर्थात स्टॅम्प ड्युटी म्हणून भरावी लागणार आहे. पनवेल सहनिबंधक कार्यालयातून निघालेल्या या नोटीसा घरी आल्यानंतर सिडकोचं घर लागलेल्यांची धावपळ उडाली आहे. सुरुवातीचा घराची नोंदणी करताना घेण्यात आलेली एक हजार रुपयांची स्टॅम्प ड्युटी कमी असल्याचा साक्षात्कार आता मुद्रांक शुल्क विभागाला धालाय. त्यामुळे या नोटीसा पाठवण्यात आल्यात.
नोटीसमध्ये नेमकं काय?
पनवेल सह दुय्यम निबंधक व्ही एल बानकर यांनी या नोटीसा पाठवल्यात. कमी भरण्यात आलेल्या स्टॅम्प ड्युटीवर तातडीनं एका महिन्याच्या आत खुलासा करावा किंवा मग उरलेली रक्कत भरावी, अशा सूचना लोकांना नोटीसद्वारे देण्यात आल्या आहेत. दरम्यान, लोकांनी तर दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे तेव्हा स्टॅम्प ड्युटी भरली होती, आता आम्ही काय खुलासा करणार? असा प्रश्न सिडकोचं घर लागलेल्यांना पडलाय. दरम्यान, दिलेल्या मुदतीत जर खुलासा केला नाही, तर वाढीव रक्कम स्टॅम्प ड्युटी म्हणून भरावी लागणार आहे.
परिपत्रक काय होतं?
सिडकोकडून 2018 पासून मेगा गृहनिर्माण योजनेंतर्गत आतापर्यंत सुमारे 25 हजार घरांची लॉटरी काढण्यात आली होती. या लॉटरीमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ज्यांना घर लागली, त्यांच्यकडून घर नोंदणीसाठी एक हजार रुपयांची स्टॅम्प ड्युटी घेण्यात यावी असे आदेश राज्य सरकारनं दिलेले. त्यानुसार रायगड जिल्हा सहनिबंधक आणि मुद्रांक कार्यालयानं 9 मार्च 2021 रोजी परिपत्रकही जारी करण्यात आलं होतं.
सरकारच्या आदेशाप्रमाणे लोकांनी एक हजार रुपयांची रक्कम स्टॅम्प ड्युटी म्हणून भरली. त्यानंतर चक्क एका वर्षानं स्टॅम्प ड्युटीची ही रक्कम कमी असल्याचा साक्षात्कार मुद्रांक शुल्क विभागाला झालाय. आर्थिक दुर्बल घटनाकांतील घराची किंमत 18 लाख रुपये आहे. त्यामुळे स्टॅम्प ड्युटीची रक्कम 19 हजार 38 रुपये होते. असं असताना तुम्ही फक्त 1000 रुपये भरले आहेत, तर उरलेले 18,038/- रुपये तातडीनं भरावेत असं नोटीसीतून बजावण्यात आलंय.