महागाई, इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक, कार्यकर्त्यांसह वर्षा गायकवाडांची नवी मुंबईत सायकल रॅली

पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे वाढते भाव आणि त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांची ढासळत चाललेली आर्थिक स्थिती यामुळे नवी मुंबई काँग्रेस आक्रमक झाली आहे.

महागाई, इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक, कार्यकर्त्यांसह वर्षा गायकवाडांची नवी मुंबईत सायकल रॅली
Varsha Gaikwad
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 11:27 PM

नवी मुंबई : पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे वाढते भाव आणि त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांची ढासळत चाललेली आर्थिक स्थिती यामुळे नवी मुंबई काँग्रेस आक्रमक झाली आहे. येथील काँग्रेस कार्यकर्त्यांसह नेत्यांनी आज नवी मुंबई महापालिका येथून एक सायकल रॅली काढली. यावेळी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. (Congress protest against fuel price hike in Navi Mumbai, Varsha Gaikwad organized a bicycle rally)

मोदी सरकारच्या काळात एक नव्हे तर तब्बल 69 वेळा पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहेत. मोदी सरकारने केलेल्या भाववाढीचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज निषेध नोंदवला. या वेळी नवी मुंबई पोलिसांनी या आंदोलकांना त्याब्यात घेतले असून त्यांच्या सायकलीसुद्धा जप्त केल्या आहेत. काँग्रेसच्या या आंदोलनात परवानगीपेक्षा अधिक सायकली वापरल्या म्हणून पोलिसांनी या सायकली जप्त केल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

महापालिकेमार्फत नागरिकांना Yulu या कंपनीकडून भाडेतत्वावर सायकली पुरवल्या जातात. विविध ठिकाणी असणाऱ्या सायकल स्टँडवर या सायकली असतात. या सायकली घेवून नवी मुंबई काँग्रेसने अभिनव रॅली काढून महागाई विरोधात आंदोलन केले. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसमार्फत हे आंदोलन करण्यात आले.

नवी मुंबई मनपा मुख्यालयाच्या समोरून सायकली घेवून रॅली काढण्यात आली होती. या आंदोलनात परवानगी फक्त दहा सायकलींसाठी देण्यात आली होती. मात्र आंदोलकांनी अधिक सायकलींचा वापर केला म्हणून पोलिसांनी या सायकली जप्त करण्याची कारवाई केली. महापालिकेमार्फत पुरवल्या जाणाऱ्या सायकली जप्त करण्याची कारवाई प्रथमच झाली आहे. नवी मुंबई मनपा मुख्यालयासमोर असणाऱ्या सर्व सायकली पोलिसांनी जप्त करून टेम्पोमधून नेल्या. हा सायकल मोर्चा कोकण भवनपर्यंत नेण्यात आला होता.

राज्यभर 10 दिवस आंदोलनांचा धडाका

मोदी सरकारने निर्माण केलेल्या कृत्रिम महागाईविरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार असून 8 जुलैपासून (गुरुवार) दहा दिवस विविध आंदोलनाच्या रुपाने मोदी सरकारच्या विरोधात एल्गार करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली काल (7 जुलै) दिली होती.

कसा असेल काँग्रेसच्या राज्यव्यापी आंदोलनाचा कार्यक्रम

8 जुलै (गुरुवार) :  सकाळी 11 वाजता सर्व विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी काँग्रेस नेते पदधिकारी व कार्यकर्ते पेट्रोल, डिझेल, गॅसच्या महागाईविरोधात सायकल यात्रा काढून केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नागपूर येथे सायकल यात्रा काढणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे हेही आंदोलनात सहभागी असतील.

कोकण विभाग : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख आणि प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान हे नवी मुंबई येथे आंदोलनात सहभागी होणार आहेत.

पश्चिम महाराष्ट्र विभाग : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, राज्यमंत्री विश्वजित कदम, प्रदेश कार्याध्यक्ष बस्वराज पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनल पटेल हे पुणे येथे आंदोलन करणार आहेत.

अमरावती विभाग : महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील अमरावती येथे आंदोलन करणार आहेत

9 जुलै (शुक्रवार) : महिला काँग्रेसचे आंदोलन.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने महागाईविरोधात सकाळी 11 वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने करुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतील.

10 जुलै (शनिवार) : जिल्हा स्तरावर सायकल यात्रा महागाईविरोधात राज्यातील सर्व शहर व जिल्हा पातळीवर सायकल यात्रा काढून केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध केला जाणार आहे.

11 जुलै (रविवार) : सह्यांची मोहिम.

11 जुलै ते 15 जुलैदरम्यान महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, एनएययूआय, सेवादल, इंटक, सर्व डिपार्टमेंट व सेल यांनी राज्यातील प्रत्येक ब्लॉकमधील पेट्रोल पंपावर इंधन दरवाढीविरोधात सामान्य नागरिकांच्या सह्यांची मोहिम राबवाली जाणार आहे.

सोमवार-मंगळवार (12-13 जुलै) : ब्लॉक तालुका पातळीवर सायकल यात्रा.

प्रत्येक ब्लॉक पातळीवर पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढलेल्या किमतींविरोधात किमान 5 किमी सायकल यात्रा काढून पेट्रोल पंपांजवळ विसर्जित केली जाईल

12 ते 15 जुलै : ब्लॉक पातळीवर महिला काँग्रेस आंदोलन.

महिला काँग्रेसच्या वतीने प्रत्येक ब्लॉक पातळीवर एलपीजी गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईविरोधात आंदोलन केले जाईल .

16 जुलै (शुक्रवार) : राज्य पातळीवर मुंबई येथे महागाईविरोधात सायकल यात्रा.

सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन करताना कोव्हिड नियमांचे पालन करावे, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या:

चर्चा प्रीतम मुंडेंची, लॉटरी भागवत कराडांना? योगा योग की मुंडे भगिनींचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न? वाचा सविस्तर

VIDEO: कोण म्हणतं मुंडे भगिनी नाराज आहेत?, उगाच बदनामी करू नका; देवेंद्र फडणवीस भडकले

‘भाजपमधून बाहेर पडाल तर काय त्रास होतो हे दाखवायचं आहे’, खडसेंच्या ईडी चौकशीवरुन भुजबळांचा भाजपवर वार

(Congress protest against fuel price hike in Navi Mumbai, Varsha Gaikwad organized a bicycle rally)

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....