डेल्टाचा नवी मुंबईत 2, उरणमध्ये एक रुग्ण आढळला, नागरिकांना गाफील न राहण्याचे आयुक्तांचे आदेश
कोरोना विषाणुच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाचली आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. अशातच निर्बंधात शिथिलता दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून शहरात गर्दी वाढत आहे. डेल्टा प्लसचा तरुणांना आणि महिलांना जास्त संसर्ग होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवी मुंबई : कोरोना विषाणुच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाचली आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. अशातच निर्बंधात शिथिलता दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून शहरात गर्दी वाढत आहे. डेल्टा प्लसचा तरुणांना आणि महिलांना जास्त संसर्ग होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवी मुंबईत डेल्टाचे तीन रुग्ण
नवी मुंबई शहरात आतापर्यंत 2 तर उरण परिसरात डेल्टाचा एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे नागरिकांनी गाफील राहू नये, असा इशारा आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला आहे.
डेल्टा प्लसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक संख्या महिलांची
डेल्टा प्लसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक संख्या महिलांची आहे. नव्या आकडेवारीनुसार 32 पुरुष आणि 33 स्त्रियांना लागण झाली आहे. याशिवाय, डेल्टा प्लसची लागण झालेल्यांमध्ये 19 ते 45 वर्षे वयोगटातील तरुणांची संख्या जवळपास 33 झाली आहे. त्या खालोखाल 46 ते 60 वर्षे वयोगटातील बाधितांची संख्या असून ती 17 आहे. तर 18 वर्षाखालील डेल्टा प्लसची लागण झालेल्या बालकांची संख्या सात आहे. तर 60 वर्षे वयापुढील रुग्णांची संख्या आठ झाली आहे.
नवी मुंबई शहरात चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत शहरात 2 डेल्टा प्लस रुग्ण आहेत. हे दोन्ही रुग्ण ऐरोली आणि घणसोली परिसरातील आहेत, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलीये.
Delta Variant : डेल्टा वेरिएंटमुळं लस घेतलेल्यांनाही संक्रमणाचा धोका, ICMRच्या अभ्यासातून उघडhttps://t.co/LgURw1UypP#Corona | #DeltaVariant | #CoronaVaccine | #Covishield
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 19, 2021
संबंधित बातम्या :
पनवेल मनपा सुरक्षा रक्षक आणि घरकाम करणाऱ्या महिलांचे लसीकरण करणार