Ganesh Naik : गणेश नाईक यांनी शारिरीक, मानसिक छळ केला; दीपा चौहान यांनी सांगितली आपबीती

गणेश नाईक आणि त्यांच्या परिवाराने मला अनेक वेळा अपमानास्पद वागणूक दिलेली आहे. अनेक वेळा त्यांच्या मुलांकडून मला धमक्या सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. एकदा माझा मुलगा त्यांच्या राहत्या घरी बालाजी टॉवरला गेला असताना त्याला तिथून हाकलून लावण्यात आलं. त्यानंतर मी आणि माझा मुलगा हे दोघेही जेव्हा गणेश नाईक यांच्या घरी गेलो तेव्हा आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली आणि आम्हाला हकलून लावलं.

Ganesh Naik : गणेश नाईक यांनी शारिरीक, मानसिक छळ केला; दीपा चौहान यांनी सांगितली आपबीती
गणेश नाईक यांनी शारिरीक, मानसिक छळ केलाImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 8:12 PM

नवी मुंबई : भाजपचे आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेने नाईक यांच्या विरोधात ही तक्रार दाखल केली आहे. सदर पीडित दीपा चौहान (Deepa Chauhan) यांनी माध्यमांसमोर आपली आपबीती सांगितली आहे. माझ्या न्याय हक्कासाठी ही लढाई मी लढत आहे. गेली 27 वर्ष मी गणेश नाईक यांच्या संपर्कात आहे. गेले 27 वर्ष गणेश नाईक आणि मी रिलेशनशीपमध्ये होतो. गणेश नाईक हे नुसते मला आश्वासने द्यायचे. आमच्या या संबंधातून मला एक मुलगा सुद्धा झाला आहे. गणेश नाईकांनी मला आश्वासन दिले की मुलगा पाच वर्षाचा होताच मी वडील म्हणून त्याला नाव देईन परंतु गणेश नाईकांनी तसं काहीच केलं नाही. गणेश नाईकांनी आम्हाला कोणतच आर्थिक पाठबळ ही दिलेली नाही, असे दीपा यांनी माध्यमांसमोर सांगितले. (Ganesh Naik tortured physically and mentally told by Deepa Chauhan)

नाईक यांच्या मुलांकडून धमक्या आल्या

गणेश नाईक यांच्यासोबत मी पूर्वी संबंधात होती. त्या संबंधातून मुलगा झाल्यानंतर त्यांनी माझ्यावर अनेक वेळा जबरदस्ती सुद्धा केलेली आहे. माझं त्यावेळेस लैंगिक शोषण झालेला आहे. आणि माझा हाच आरोप आहे की गणेश नाईक यांनी माझं जबरदस्तीने लैंगिक शोषण केलेलं आहे. गणेश नाईक आणि त्यांच्या परिवाराने मला अनेक वेळा अपमानास्पद वागणूक दिलेली आहे. अनेक वेळा त्यांच्या मुलांकडून मला धमक्या सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. एकदा माझा मुलगा त्यांच्या राहत्या घरी बालाजी टॉवरला गेला असताना त्याला तिथून हाकलून लावण्यात आलं. त्यानंतर मी आणि माझा मुलगा हे दोघेही जेव्हा गणेश नाईक यांच्या घरी गेलो तेव्हा आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली आणि आम्हाला हकलून लावलं.

मला न्याय मिळावा हीच माझी भूमिका

माझा शारीरिक आणि मानसिक छळ गणेश नाईक यांनी केला आहे. आता गणेश नाईक यांच्या विरोधात अनेक संघटना अनेक पक्ष पुढे येत आहेत. त्यांच्या अटकेची मागणी होत आहे. परंतु मला यासंदर्भात काही बोलायचं नाही. मला माझा न्याय आणि हक्क हा मिळाला पाहिजे यासाठी मी ही लढाई माझ्या वकिलांमार्फत लढत आहे. गणेश नाईक आणि माझे खूप सारे फोटो आणि व्हीडिओ सुद्धा आहेत. मी काही फोटो हे मीडियाला दिलेले आहेत.माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. मला न्याय मिळावा हीच भूमिका माझी आहे, असे दीपा यांनी स्पष्ट केले. (Ganesh Naik tortured physically and mentally told by Deepa Chauhan)

इतर बातम्या

Solapur : सोलापुरातील जवानाला उत्तराखंडमध्ये वीरमरण, लष्कराचे वाहन दरीत कोसळले

Achalpur Violence : अचलपूर दंगलीप्रकरणी आरोपींचा कोठडी मुक्काम 3 दिवसांनी वाढला, परिसरात नवे नियम

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.