हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा मनस्ताप कमी होणार, पनवेल ते गोरेगाव थेट लोकल सुरु

हार्बल रेल्वे (Harbour Railway) मार्गावरील प्रवाशांना पश्चिम मार्गावर (Western Railway) जाण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागते. कारण, हार्बर ते पश्चिमच्या लोकल फेऱ्या फार कमी होत्या. तसेच, हार्बर मार्गावरुन पनवेल ते अंधेरीपर्यंतच फक्त लोकल सेवा सुरु होती. मात्र, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेने बुधवार 1 डिसेंबरपासून प्रथमच गोरेगाव ते पनवेल अशी लोकल सेवा सुरु केली आहे.

हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा मनस्ताप कमी होणार, पनवेल ते गोरेगाव थेट लोकल सुरु
Mumbai Local
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 9:19 AM

नवी मुंबई : हार्बल रेल्वे (Harbour Railway) मार्गावरील प्रवाशांना पश्चिम मार्गावर (Western Railway) जाण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागते. कारण, हार्बर ते पश्चिमच्या लोकल फेऱ्या फार कमी होत्या. तसेच, हार्बर मार्गावरुन पनवेल ते अंधेरीपर्यंतच फक्त लोकल सेवा सुरु होती. मात्र, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेने बुधवार 1 डिसेंबरपासून प्रथमच गोरेगाव ते पनवेल अशी लोकल सेवा सुरु केली आहे.

हार्बरवर सध्या पनवेल ते अंधेरीपर्यंत लोकल आहे. आता त्याचा विस्तार करुन ती गोरेगावपर्यंत नेण्यात येणार आहे. या लोकलच्या दिवसभरात 18 फेऱ्या होणार आहेत. मध्य रेल्वेच्या हार्बर, ट्रान्सहार्बर, बेलापूर-नेरुळ-खारकोपर मार्गाचे सुधारित वेळापत्रक येत्या 1 डिसेंबरपासून लागू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिलीये.

कांदिवली, मालाड, जोगेश्वरी, राम मंदिर आणि गोरेगाव स्थानकांतून हार्बरसाठी मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. मात्र, या मार्गावर फक्त अंधेरीपर्यंतच लोकल धावायची. तसेच, गोरेगाव ते पनवेल लोकल नसल्याने वसई, विरार, बोरिवली ते मालाड, गोरेगावपर्यंतच्या प्रवाशांना अंधेरी स्थानक गाठावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांची मागणी लक्षात घेता अंधेरीपर्यंत असलेल्या हार्बरचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी 2009 मध्ये मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून एमयूटीपी 2 अंतर्गत विस्ताराचे काम हाती घेण्यात आले होते.

हार्बरवासीयांचाही प्रवास गारेगार होणार

वातानुकूलित लोकलचा (AC Local) अनुभव आता हार्बरवासीयांनाही (Harbour Railway) मिळणार आहे. नेहमी दुर्लक्षित असलेल्या हार्बल रेल्वेवर आता वातानुकूलित लोकल चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. येत्या 1 डिसेंबरपासून हार्बल रेल्वेवर सीएसएमटी ते पनवेल मार्गावर या एसी लोकल धावणार आहेत. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनाही आता एसी लोकलचा अनुभव घेता येणार आहे.

सीएसएमटी ते पनवेल मार्गावर 12 एसी लोकल धावणार

सीएसएमटी ते पनवेल मार्गावर 1 डिसेंबरपासून वातानुकूलित लोकल चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या लोकलच्या दिवसाला 12 फेऱ्या होणार आहेत. सामान्य लोकलच्या 12 फेऱ्यांऐवजी वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. याशिवाय, मध्य रेल्वेने हार्बरवरील काही लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकातही बदल केले आहेत. त्यानुसार गोरेगाव आणि पनवेलच्या प्रवाशांनाही दिलासा मिळाला आहे. येत्या 1 डिसेंबरपासून हे नवे वेळापत्रक लागू होणार आहे.

या एसी लोकल फक्त सोमवार ते शनिवार चालवण्यात येणार आहेत. रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी मात्र एसी लोकलऐवजी साध्या लोकल चालविण्यात येईल. तर, मागणी वाढल्यास साध्या लोकल एसी लोकलने बदलण्यात येतील आणि रविवारी, तसेच सुट्ट्यांच्या दिवशीही एसी लोकल सोडल्या जातील. या एसी लोकलच्या तिकीटांचे तसेच पासचे दर सोमवारी जारी केले जातील.

सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर (सीएसएमटी ते कल्याण) एसी लोकलच्या 10 आणि ट्रान्सहार्बरवर (ठाणे ते वाशी पनवेल) एसी लोकलच्या 16 फेऱ्या चालविण्यात येत आहेत. हार्बर मार्गावरील एकूण फेऱ्यांची संख्या 614 आणि ट्रान्सहार्बर लाइनवर 262 आहेत. मध्य रेल्वेच्या रोजच्या फेऱ्यांची एकूण संख्या 1774 आहे.

हार्बरमार्गावरील एसी लोकलचे वेळापत्रक –

अप –

वाशी-सीएसएमटी – सकाळी 4.25

पनवेल -सीएसएमटी – सकाळी 6.45

पनवेल सीएसएमटी- सकाळी 9.40

पनवेल सीएसएमटी- दुपारी 12.41

पनवेल -सीएसएमटी- दुपारी 3.45

पनवेल -सीएसएमटी- सायंकाळी 6.37

डाऊन –

सीएसएमटी-पनवेल- सकाळी 5.18

सीएसएमटी-पनवेल- सकाळी 8.08

सीएसएमटी-पनवेल- सकाळी 11.04

सीएसएमटी- पनवेल- दुपारी 2.12

सीएसएमटी – पनवेल- सायंकाळी 5.08

संबंधित बातम्या :

हार्बरवासीयांचाही प्रवास गारेगार होणार, 1 डिसेंबरपासून सीएसएमटी-पनवेल एसी लोकल धावणार

धीम्या मार्गावरही आता गारेगार प्रवास, चर्चगेट-विरार दरम्यान स्लो AC लोकल

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.