हार्बरवासीयांचाही प्रवास गारेगार होणार, 1 डिसेंबरपासून सीएसएमटी-पनवेल एसी लोकल धावणार
वातानुकूलित लोकलचा (AC Local) अनुभव आता हार्बरवासीयांनाही (Harbour Railway) मिळणार आहे. नेहमी दुर्लक्षित असलेल्या हार्बल रेल्वेवर आता वातानुकूलित लोकल चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. येत्या 1 डिसेंबरपासून हार्बल रेल्वेवर सीएसएमटी ते पनवेल मार्गावर या एसी लोकल धावणार आहेत.
नवी मुंबई : वातानुकूलित लोकलचा (AC Local) अनुभव आता हार्बरवासीयांनाही (Harbour Railway) मिळणार आहे. नेहमी दुर्लक्षित असलेल्या हार्बल रेल्वेवर आता वातानुकूलित लोकल चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. येत्या 1 डिसेंबरपासून हार्बल रेल्वेवर सीएसएमटी ते पनवेल मार्गावर या एसी लोकल धावणार आहेत. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनाही आता एसी लोकलचा अनुभव घेता येणार आहे.
सीएसएमटी ते पनवेल मार्गावर 12 एसी लोकल धावणार
सीएसएमटी ते पनवेल मार्गावर 1 डिसेंबरपासून वातानुकूलित लोकल चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या लोकलच्या दिवसाला 12 फेऱ्या होणार आहेत. सामान्य लोकलच्या 12 फेऱ्यांऐवजी वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. याशिवाय, मध्य रेल्वेने हार्बरवरील काही लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकातही बदल केले आहेत. त्यानुसार गोरेगाव आणि पनवेलच्या प्रवाशांनाही दिलासा मिळाला आहे. येत्या 1 डिसेंबरपासून हे नवे वेळापत्रक लागू होणार आहे.
गोरेगाव ते पनवेल लोकलही सोडल्या जाणार
प्रथमच गोरेगाव ते पनवेल लोकलही सोडल्या जाणार आहेत. त्याच्या 18 फेऱ्या 1 डिसेंबरपासून होतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. हार्बरवर अंधेरीपर्यंत होणाऱ्या लोकल फेऱ्यांचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. अशा 44 लोकल फेऱ्यांचा समावेश आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर, ट्रान्सहार्बर, बेलापूर-नेरुळ-खारकोपर मार्गाचे सुधारित वेळापत्रक येत्या 1 डिसेंबरपासून लागू होणार आहे.
या एसी लोकल फक्त सोमवार ते शनिवार चालवण्यात येणार आहेत. रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी मात्र एसी लोकलऐवजी साध्या लोकल चालविण्यात येईल. तर, मागणी वाढल्यास साध्या लोकल एसी लोकलने बदलण्यात येतील आणि रविवारी, तसेच सुट्ट्यांच्या दिवशीही एसी लोकल सोडल्या जातील. या एसी लोकलच्या तिकीटांचे तसेच पासचे दर सोमवारी जारी केले जातील.
सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर (सीएसएमटी ते कल्याण) एसी लोकलच्या 10 आणि ट्रान्सहार्बरवर (ठाणे ते वाशी पनवेल) एसी लोकलच्या 16 फेऱ्या चालविण्यात येत आहेत. हार्बर मार्गावरील एकूण फेऱ्यांची संख्या 614 आणि ट्रान्सहार्बर लाइनवर 262 आहेत. मध्य रेल्वेच्या रोजच्या फेऱ्यांची एकूण संख्या 1774 आहे.
हार्बरमार्गावरील एसी लोकलचे वेळापत्रक –
अप –
वाशी-सीएसएमटी – सकाळी 4.25
पनवेल -सीएसएमटी – सकाळी 6.45
पनवेल सीएसएमटी- सकाळी 9.40
पनवेल सीएसएमटी- दुपारी 12.41
पनवेल -सीएसएमटी- दुपारी 3.45
पनवेल -सीएसएमटी- सायंकाळी 6.37
डाऊन –
सीएसएमटी-पनवेल- सकाळी 5.18
सीएसएमटी-पनवेल- सकाळी 8.08
सीएसएमटी-पनवेल- सकाळी 11.04
सीएसएमटी- पनवेल- दुपारी 2.12
सीएसएमटी – पनवेल- सायंकाळी 5.08
संबंधित बातम्या :
धीम्या मार्गावरही आता गारेगार प्रवास, चर्चगेट-विरार दरम्यान स्लो AC लोकल