गृहिणींचे बजेट कोलमडले, घरगुती सिलिंडर 25 रुपयांनी तर व्यावसायिक सिलेंडर 75 रुपयांनी महागला

वर्ष 2021 च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीत एलपीजी सिलिंडरची किंमत 694 रुपये होती, जी आता वाढून 884.50 रुपये झाली. अशा प्रकारे एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत आतापर्यंत 9 महिन्यांत 190.50 रुपयांची वाढ झाली.

गृहिणींचे बजेट कोलमडले, घरगुती सिलिंडर 25 रुपयांनी तर व्यावसायिक सिलेंडर 75 रुपयांनी महागला
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 4:43 PM

पनवेल : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी सामान्य माणसाला मोठा झटका बसलाय. सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवल्यात. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन(IOC)ने विनाअनुदानित 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ केलीय. त्याचबरोबर 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 75 रुपयांनी वाढ झालीय. आता 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 884.5 रुपये झाली आहे. यापूर्वी 18 ऑगस्ट रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. एलपीजीची किंमत 834.50 रुपयांवरून 859.50 रुपये करण्यात आली. 15 दिवसांत विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महाग झालेत. (Housewives’ budget collapses, cooking cylinder goes up by Rs 25, commercial cylinder by Rs 75)

एलपीजी सिलिंडर यंदा 190.5 रुपयांनी महागले

सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या किमती बदलतात. वर्ष 2021 च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीत एलपीजी सिलिंडरची किंमत 694 रुपये होती, जी आता वाढून 884.50 रुपये झाली. अशा प्रकारे एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत आतापर्यंत 9 महिन्यांत 190.50 रुपयांची वाढ झाली.

व्यावसायिक गॅस सिलिंडरची नवी किंमत

मुंबईमध्ये 19 किलो व्यावसायिक गॅसची किंमत 1649 रुपये तर दिल्लीत1693 रुपये आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत कोलकातामध्ये 1,772 रुपये, आणि चेन्नईमध्ये 1,831 रुपये प्रति सिलिंडर आहे.

सिलिंडरच्या वाढत्या किंमतीवर गृहिणींची नाराजी

आधीच कोरोनाने नोकऱ्या गेल्या, धंदे बंद आहेत, त्यात अशी जर नेहमी दरवाढ होत असेल तर सामान्य माणूस एक दिवस आत्महत्याच करेल किंवा उपाशी मरेल. गृहिणी एक एक रुपया वाचवून संसार करत असतात. आधीच 2 वर्षापासून सबसिडी बंद झाली आहे. 600 रुपयांना मिळणारा सिलेंडर आता 800 च्या वर गेला आहे. घर कसे चालवायचे असा प्रश्न गृहिणींसमोर उभा आहे. सरकारने दरवाढ करताना थोडा तरी विचार करायला हवा. सध्या मध्यमवर्गीय लोकांसमोर जगायचं कसं हा प्रश्न आहे. त्यात प्रत्येक बाबतीत दरवाढ करत असाल तर कसे चालेल, असा सवालही गृहिणी करीत आहेत.

आधीच कोरोनामुळे व्यवसाय बंद असल्याने मेटाकुटीस आलेल्या हॉटेल व्यावस्यिकांनीही या दरवाढीवर नाराजी व्यक्त केली आहे. एक वर्षाआधी व्यवसायिक सिलेंडर 1000 रुपयांना मिळत होते आता 1600 रुपयांच्या वर जाते. त्यात दोन वर्ष आम्ही कसे काढली आम्हालाच माहीत आहे. आम्ही जे फूड ग्राहकांना देतो त्याच्या किंमती त्याच आहेत. त्यात कुठलीही वाढ नाही त्यात लॉकडाऊनमुळे व्यवसाय कमी झाला आहे. या किंमती आणखी वाढल्या तर आम्ही व्यवसाय कसा करायचा ? असा सवाल हॉटेल व्यावसायिक करत आहेत. (Housewives’ budget collapses, cooking cylinder goes up by Rs 25, commercial cylinder by Rs 75)

इतर बातम्या

नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, धनजंय मुंडेंकडून शेतकऱ्यांना धीर 

शेअर बाजाराचा पुन्हा एक नवा विक्रम, काही मिनिटांतच गुंतवणूकदारांनी 2.55 लाख कोटी कमावले

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.