अनधिकृत फेरीवाल्यांच्या पालिका कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यात वाढ, औरंगाबादनंतर नेरूळमध्येही मारहाण
नवी मुंबई : सध्या राज्यात अनधिकृत फेरीवाल्यांचे पालिका कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे. औरंगाबादनंतर आता नवी मुंबईतही असाच प्रकार घडलाय. नवी मुंबई महानगर पालिकेच्यावतीने संपूर्ण नवी मुंबई क्षेत्रामध्ये प्लास्टिक वापरणारे विक्रेते आणि सोशल डिस्टन्सिंगसह माक्सचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर जोरदार कारवाई सुरु आहे. या दरम्यान नेरुळ विभागातील अधिकारी मंगळवारी दुपारी कारवाईसाठी गेले असता तेथील […]
नवी मुंबई : सध्या राज्यात अनधिकृत फेरीवाल्यांचे पालिका कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे. औरंगाबादनंतर आता नवी मुंबईतही असाच प्रकार घडलाय. नवी मुंबई महानगर पालिकेच्यावतीने संपूर्ण नवी मुंबई क्षेत्रामध्ये प्लास्टिक वापरणारे विक्रेते आणि सोशल डिस्टन्सिंगसह माक्सचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर जोरदार कारवाई सुरु आहे. या दरम्यान नेरुळ विभागातील अधिकारी मंगळवारी दुपारी कारवाईसाठी गेले असता तेथील अनधिकृत फेरीवाल्यांनी या अधिकाऱ्यांवर दगडफेक करीत उसाचे दांडके, काठ्या, चाकू, सुरा दाखवत हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे (Illegal hawkers attack on corporation officers in Nerul Navi Mumbai).
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्या आदेशानुसार स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शहराला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विना माक्स फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी (2 मार्च) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास नेरूळ रेल्वे स्थानक परिसरातील अभुदय बँकेच्या जवळ रस्त्यावर प्लास्टिक पिशव्या वापरणारे व्यापारी फेरीवाले त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्स न पाळणारे आणि विना माक्स वावरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी विभाग अधिकारी दत्तात्रय नागरे, वरिष्ठ लिपिक विजय पाटील, अधीक्षक प्रशांत गावडे, स्वच्छता निरीक्षक निलेश पाटील आणि सहकारी आले.
उसाचे दांडके, काठ्या चाकू, सुरा दाखवत हल्ला
यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांना, तुम्ही मास्कचा वापर करत नाही, सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचं पालन करत नसाल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं बजावलं. त्यावेळी फेरीवाल्यांनी या कारवाईला विरोध करत पालिकेच्या पथकावर भाज्या फेकल्या. त्यानंतर अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे विरोध केला, तर त्यांच्यावर दगडफेक केली. उसाचे दांडके, काठ्या चाकू, सुरा दाखवून हल्ला करण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना पिटाळून लावले. यामध्ये एका अधिकाऱ्याच्या पायाला दुखापत झाल्याचीही माहिती आहे.
अंकुश न लावल्यास पालिका कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांनाही त्रास होणार
सदर फेरीवाले हे अनधिकृतरित्या येथील जागेवर कब्जा करून व्यवसाय करीत आहेत. हे फेरीवाले नवी मुंबईतील अथवा स्थानिक नसल्याचे समजते. अशा प्रकारे ऐरोली, तुर्भे, वाशी, नेरुळ मध्ये ठिकठिकाणी आठवडे बाजार सुद्धा भरवण्यात येतो. या आठवडे बाजारांमध्ये गोवंडी, चेंबूर, कल्याण, मुंब्रा, मुंबई येथील अनेक फेरीवाले येतात. यावर लवकरच अंकुश न लावल्यास पालिका कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांना सुद्धा नाहक त्रास सोसावा लागणार आहे.
हेही वाचा :
राज्य सरकार फेरीवाले, रिक्षाचालकांना कधी मदत करणार?; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल
फेरीवाल्यांचे धक्के खात आयुक्त कल्याण-डोंबिवलीत, तासाभरात कारवाईचा बडगा
व्हिडीओ पाहा :
Illegal hawkers attack on corporation officers in Nerul Navi Mumbai