नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्यासाठी क्रांती दिनी गावागावात मशाल मोर्चा

9 ऑगस्ट हा दिवस 'क्रांती दिन. 1942 साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी या दिवशी मुंबई येथील गोवालिया टँक येथून समस्त भारतीयांना 'अंग्रेज चले जाओ' अशी हाक दिली. नवी मुंबईच्या निर्मितीसह देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब यांनी केलेला संघर्ष व त्याग लक्षात घेऊन आणि भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची ओळख जपण्यासाठी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, ही मागणी समजून घेण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे.

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्यासाठी क्रांती दिनी गावागावात मशाल मोर्चा
Navi Mumbai Mashal Morcha
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 11:39 AM

नवी मुंबई : 9 ऑगस्ट हा दिवस ‘क्रांती दिन. 1942 साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी या दिवशी मुंबई येथील गोवालिया टँक येथून समस्त भारतीयांना ‘अंग्रेज चले जाओ’ अशी हाक दिली. नवी मुंबईच्या निर्मितीसह देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब यांनी केलेला संघर्ष व त्याग लक्षात घेऊन आणि भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची ओळख जपण्यासाठी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, ही मागणी समजून घेण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्मगावापासून ठाणे, रायगड, नवी मुंबई, मुंबईसह विविध जिल्ह्यांतील गावागावात ‘मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी दिली.

पनवेल येथील पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला समितीचे उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, कामगार नेते भूषण पाटील, उपमहापौर जगदिश गायकवाड, संतोष केणे, सुरेश पाटील, गुलाब वझे, जे.डी. तांडेल, दीपक म्हात्रे, राजेश गायकर, मनोहर पाटील, विनोद म्हात्रे, आदी उपस्थित होते.

लोकनेते रामशेठ ठाकूर पुढे म्हणाले की, प्रत्येक मशाल ही दि. बा. पाटील यांनी दिलेल्या क्रांतीच्या लढ्याची ओळख असेल. त्यामुळे प्रत्येक गाव आपल्या भूमिपुत्रांच्या व्यथा या मशाल मोर्चाद्वारे मांडणार आहे आणि मशाल मोर्चात शपथ घेऊन पुढच्या तीव्र आंदोलनाची दिशा जाहीर करणार असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. नावाबाबत केंद्राला घाई नाही मात्र ठराविक नाव देण्याची घाई महाराष्ट्र सरकारला झाली, त्यामुळेच संघर्षाची लढाई सुरु झाली पण ही लढाई जिंकण्यासाठी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त मैदानात उतरला आहे. 15 ऑगस्ट सरकारला डेडलाईन दिली आहे, या तारखेपर्यंत सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने न्याय द्यावा, अन्यथा 16 ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद पाडले जाईल, अशी रोखठोक भूमिका मांडत कदापिही मागे हटायचे नाही, दिबासाहेबांचे नाव विमानतळाला लागेपर्यंत हटायचे नाही, अशी गर्जनाही केली.

प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, मशाल मोर्चा हा 10 आणि 24 जून रोजी झालेल्या नामकरण आंदोलनाच्या कार्यक्रमाचा पुढील टप्पा आहे. या मशाल मोर्चासाठी ज्या मशाली प्रज्वलीत केल्या जातील त्यांची सुरुवात लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्मगावापासून म्हणजे उरण तालुक्यातील जासई येथून, महापुरुष, हुतात्म्यांना तसेच लोकनेते दि. बा. पाटील यांना वंदन करुन करण्यात येईल. त्यासाठी 9 ऑगस्ट रोजी तेथे एक मोठी क्रांती ज्योत प्रज्वलीत केली जाईल. यावेळी कृती समितीचे सदस्य आणि मान्यवरांच्या उपस्थितीत विविध जिल्ह्यांतून, तालुक्यातून आणि विभागातून आलेले विशेष प्रतिनिधी, त्या मुख्य मोठ्या ज्योतीद्वारे आपल्या मशाली प्रज्वलीत करतील आणि आपापल्या ठिकाणी घेऊन जातील.

त्यानंतर विशेष प्रतिनिधींनी नेलेल्या मशालीची ही क्रांती ज्योत, त्या त्या ठिकाणच्या गावागावातून आलेले प्रतिनीधी, गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या गावासाठी ही क्रांती ज्योत प्रज्वलीत करतील आणि गावात आणि विभागात ‘मशाल मोर्चा’ काढतील. यावेळी लोकनेते दि.बा.पाटील यांच्या नामकरणाची प्रतिज्ञा केली जाईल, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. आयुष्याच्या सुरुवातीपासून ते अंतिम श्वासापर्यंत दिबासाहेबांनी लोकांसाठी संघर्ष केला. त्यांच्या संघर्षाची जाणिव भूमिपुत्रांना आहे. त्यामुळे सरकारच्या दडपशाहीला भूमिपुत्र घाबरणार नाही, असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

कृती समितीचे खजिनदार जे. डी. तांडेल यांनी सांगितले की, आज सरकार भूमिपूत्रांना सूडाची वागणूक देत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सरकारबद्दल तीव्र संताप निर्माण झाला आहे. या आंदोलनाच्या द्वारे हा संताप व्यक्त करून, दि. बा. पाटील यांनी दिलेल्या लढ्याच्या प्रश्नांना पुन्हा वाचा फोडण्यात येईल. दि. बा. पाटील यांच्या अलौकिक कार्याची प्रेरणा घेऊन, आपला नामकरणाचा लढा यशस्वी करणे, हाच हेतू ध्यानात घेऊन या क्रांतीच्या मशाली प्रज्वलीत केल्या जातील.

आमदार महेश बालदी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा उरणमध्ये आले होते त्यावेळी जेएनपीटी साडेबारा टक्के इरादा पत्र वाटप करण्यात आले त्यानुसार विकसित भूखंडाचे वितरण करण्याला वेग आला. त्या संदर्भात 400 कोटी रुपये सिडकोकडे वर्ग झाले. केंद्र सरकारने त्यांचे काम पूर्ण केले मात्र सिडको आणि राज्य शासन यांच्या आकसापोटी भुमिकेमुळे कार्यवाही जाणूनबुजून थंडावली आहे. विमानतळाला दिबासाहेबांचे नाव लागण्यासाठी पुढच्या आठवड्यात केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री तसेच महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री यांची समिती भेट घेण्यात येणार आहे.

कॉम्रेड भूषण पाटील म्हणाले, 9 ऑगस्ट आंदोलनाचा तिसरा टप्पा आहे. राज्यातून भूमिपुत्र एकवटला असून आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छांच्या बॅनरमध्ये शुभेच्छा देताना विमानतळाला दिबांचे नाव असे अनेक ठिकाणी बॅनर झळकले, याच्यावरुन दिबांच्याच नावाला राज्यभरातून मान्यता मिळत असल्याचे स्पष्ट आहे. हे आंदोलन सर्व समाजाचे आहे त्यामुळे दिबांच्या नावासाठी सर्वांचे स्वागत आहे. त्यामुळे समितीतून सर्वपक्षीय नाव काढले नाही.

संबंधित बातम्या :

नवी मुंबई विमानतळाला ‘दि. बा. पाटील’ यांचे नाव देण्यासाठी 9 ऑगस्टला मशाल मोर्चा

दि. बा. पाटलांचं नाव नवी मुंबई विमानतळाला द्या, रविकांत तुपकर आक्रमक

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.