AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबई, पनवेलमध्ये पावसाची रिमझिम, तरीही उकाड्यापासून दिलासा नाहीच

नवी मुंबई, पनवेल परिसरात गेले दोन दिवस पावसाची रिपरिप सुरु आहे. सोमवार दुपारपासून सुरु असलेल्या उन्ह आणि पावसाच्या या खेळामुळे उकाडा कमी होण्याऐवजी आणखी वाढलाय. त्यामुळे पाऊस झाला तरी नवी मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळालेला नाही.

नवी मुंबई, पनवेलमध्ये पावसाची रिमझिम, तरीही उकाड्यापासून दिलासा नाहीच
Navi Mumbai Rain
| Edited By: | Updated on: Sep 01, 2021 | 11:31 AM
Share

नवी मुंबई : नवी मुंबई, पनवेल परिसरात गेले दोन दिवस पावसाची रिपरिप सुरु आहे. सोमवार दुपारपासून सुरु असलेल्या उन्ह आणि पावसाच्या या खेळामुळे उकाडा कमी होण्याऐवजी आणखी वाढलाय. त्यामुळे पाऊस झाला तरी नवी मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळालेला नाही.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस झाल्यांनंतर पावसाने तब्बल 20 दिवस दडी मारली होती. आता गेले दोन दिवस पावसाने जोर धरला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर सोमवारपासून पावसाला सुरुवात झाली.

Navi Mumbai Rain

Navi Mumbai Rain

सोमवारी दिवसभर पावसाळी वातावरण होते. मात्र, दुपारनंतर पावसाने जोर धरला. मंगळवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु होती. हीच रिपरिप आज सकाळपासून सुध्दा सुरु आहे. त्यामुळे कामावर जाण्यासाठी निघालेल्या नोकरदारांची धांदल उडाली होती.

दोन दिवस सुरु असणाऱ्या पावसामुळे नवी मुंबई, पनवेलमधील सखल भाग, रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. ठाणे बेलापूर मार्गावरील रबाळे टी जंक्शनपासून ते रबाळे स्टेशनपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. तर, पळस्पेकडे जाणाऱ्या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतूक धिम्म्या गतीने सुरु आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी डांबर आणि खडी टाकून बुजवलेले खड्डे पुन्हा उखडले होते.

मुंबई हवामान विभागाचा अंदाज काय?

दरम्यान, मुंबई हवामान विभागाने मंगळवारी (31 ऑगस्ट) सॅटेलाईट आणि रडार इमेजेसच्या आधारे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि बीडमध्ये पावसाचा जोर अधिक असेल असंही नमूद करण्यात आलंय. पालघर, रायगड, ठाणे या कोकणातील भागात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर म्हणाले, “छत्तीसगडवर 30 ऑगस्टला कमी दाबाचे क्षेत्र आहे. 15 अंश उत्तरवर पूर्व-पश्र्चिम शियर जोन आहे. याचा प्रभाव म्हणून महाराष्ट्र राज्यासाठी IMD पुढील 3-4 दिवसांसाठी काही इशारे देत आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे. यात मुंबई, ठाणे, उत्तर कोकणाचाही समावेश आहे.”

संबंधित बातम्या :

Pune Weather | काल पावसाची संततधार, आज पुण्यात हलक्या सरींची शक्यता

Maharashtra Rains : राज्यात पावसाचा जोर कमी, अनेक ठिकाणी उघड-झाप, कुठे काय स्थिती?

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.