कर्नाळा बँक ठेवीदारांचा 6 जुलैला ‘रास्ता रोको’, केंद्र आणि राज्य सरकारला जागं करण्यासाठी कळंबोलीत निदर्शनं
ठेवीदारांच्या भावनेचा आदर करून कडू यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि केंद्रातील भाजपप्रणित केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारले आहे. (Karnala Bank depositors roadblock on July 6)
पनवेल : राज्यात जवळपास 1600 कोटीचे बँक घोटाळे झाले असतानाही राज्य आणि केंद्र शासन डोळे मिटून बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे ठेवीदारांना न्याय मिळणे दुरापास्त होत असल्याने दोन्ही सरकारना गदगदा हलवून जागे करण्यासाठी कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या (Karnala Bank) ठेवीदारांनी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी, 6 जुलैला सकाळी 10.30 वाजता कळंबोली येथे एमजीएम हॉस्पिटलसमोर महामार्ग रोखण्याचा निर्णय घेतला असून तिथे ‘रास्ता रोको’ करण्यात येणार आहे. (Meetings of minister-officer did not solve the problem Karnala Bank depositors roadblock on July 6)
गेल्या वर्षभरापासून पनवेल संघर्ष समितीने सहकार खात्यातील वरिष्ठ अधिकारी, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलिस महासंचालक राजेंद्र सिंह, सीआयडी विभागाचे रंजन शर्मा, पुणे सीआयडी अधीक्षक सरोज सरोदे यांच्याकडे वारंवार बैठका घेवून बँक ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळाव्यात म्हणून संघर्ष सुरू ठेवला आहे.
त्यात देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे अधीक्षक शैलेंद्र कुमार यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहाराची त्यांनी दखल घेतल्याने कर्नाळा बँक घोटाळ्याच्या चौकशीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. तसेच सक्त संचालनालयाच्या (ईडी) मुंबई कार्यालयाने थेट मुख्य आरोपीला अटक केल्याने पनवेल संघर्ष समितीच्या मेहनतपूर्वक लढ्याला मोठे यश आल्याची खात्री ठेवीदारांची झाली आहे.
ठेवीदारांच्या भावनेचा आदर करून कडू यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि केंद्रातील भाजपप्रणित केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारले आहे. कर्नाळा बँकेचा व्यवसाय परवाना रद्द करावा, ठेवीदारांच्या ठेवींना असलेले पाच लाखापर्यंतचे विमा संरक्षण लक्षात घेवून त्यांना पैसे द्यावेत, अन्य दोषींवर अटकेची कारवाई करावी आणि दोषींच्या मालमत्ता गोठवून त्या लवकरात लवकर लिलावात काढून पाच लाखांपेक्षा जास्त रुपयांच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी द्याव्यात अशा मागण्यांसाठी हे आंदोलन आहे, अशी माहिती पनवेल संघर्ष समितीचे शांतीलाल कडू यांनी दिली आहे.
(Meetings of minister-officer did not solve the problem Karnala Bank depositors roadblock on July 6)
हे ही वाचा :
मोठी बातमी ! कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक
नीरव मोदीच्या बहिणीने लंडनमधील बँकेतून भारत सरकारच्या खात्यावर 17 कोटी जमा केले, कारण काय?
Dollar vs Rupees : रुपयाची पडझड सुरूच, दोन महिन्यांच्या निचांकी स्तरावर