Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navi Mumbai Metro : ठरलं! राज्यसभा निवडणुकीनंतर नवी मुंबईत मेट्रो धावणार?

मेट्रो प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी सिडकोला सर्व आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या असून, राज्यसभा निवडणुकीनंतर नवी मुंबईमध्ये मेट्रो धावणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Navi Mumbai Metro : ठरलं! राज्यसभा निवडणुकीनंतर नवी मुंबईत मेट्रो धावणार?
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 2:21 PM

नवी मुंबई : नवी मुंबईकरांसाठी (Navi Mumbai) आनंदाची बातमी आहे. विविध कारणांमुळे गेल्या दहा वर्षांपासून रखडलेली मेट्रो (Metro) आता लवकरच धावण्याची शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर (Rajya Sabha elections) प्रवासी सेवा सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या सिडकोला मिळाल्या आहेत. परवानग्या मिळाल्याने सिडकोकडून तयारीला वेग आला आहे. मात्र आता उद्घाटनामुळे मेट्रो सुरू करण्यास विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. सध्या राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील प्रमुख नेते हे सध्या राज्यसभा निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे उद्घाटनासाठी संबंधित मंत्र्यांच्या तारखा उपलब्ध होत नसल्याने मेट्रो प्रवास लांबणीवर पडल्याचे बोलले जात आहे. मात्र आता राज्यसभा निवडणुकीनंतर लगेच राज्य सरकारच्या वतीने मेट्रोचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

महामेट्रोकडून वर्षभरात काम पूर्ण

नवी मुंबईतील दळणवळण व्यवस्था अधिक गतिमान व्हावी यासाठी सिडकोकडून पेंधर ते बेलापूरदरम्यान 2011 साली मेट्रोच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र त्यानंतर सातत्याने मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीमध्ये अडथळे येत गेले. त्यामुळे मेट्रो प्रकल्प रखडला त्याच्या खर्चात देखील वाढ झाली. पुढे या प्रकल्पाची जबाबदारी महामेट्रोवर सोपवण्यात आली. महामेट्रोने प्रकल्पाची जबाबदारी घेतल्यानंतर अवघ्या एका वर्षात मेट्रो प्रकल्प उभारण्यात आला. प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व चाचण्या सिडकोने पूर्ण केल्या असून, त्यांना रेल्वे सुरक्षा मंडळाकडून नाहरकत प्रमाणपत्र देखील मिळाले आहे.

हे सुद्धा वाचा

सिडकोकडून पाठपुरावा

मेट्रोच्या प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या सिडकोला मिळाल्या आहेत. मात्र आता उद्घाटनासाठी मेट्रोलचा प्रवास थांबला आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर लगेचच उद्घाटन करण्यात येणार असून, नवी मुंबईत मेट्रो धावणार आहे. उद्घाटनासाठी मंत्र्यांची तारीख मिळावी यासाठी सिडकोकडून पाठपुरावा देखील सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता मेट्रोल मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.