मुंबईच्या टोरेस घोटाळ्यानंतर आता नवी मुंबईत मोठा आर्थिक घोटाळा, मोठ्या परताव्याचे अमिष दाखवून लुटले

आता नवी मुंबईतील एक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीने देखील मोठ्या परताव्याचे अमिष दाखवून लाखो नवी मुंबईकरांना चुना लावल्याची घटना समोर आली आहे.

मुंबईच्या टोरेस घोटाळ्यानंतर आता नवी मुंबईत मोठा आर्थिक घोटाळा, मोठ्या परताव्याचे अमिष दाखवून लुटले
Navi mumbai scam
Follow us
| Updated on: Jan 13, 2025 | 9:28 AM

मुंबईतील दादर परिसरातील टोरेस कंपनीने लाखो मुंबईकरांना गंडवले आहे. टोरेस कंपनीच्या फसवणुकीप्रकरणी चौकशी सुरु आहे. मुंबईत इतका मोठा घोटाळा समोर आलेला असताना आता नवी मुंबईत आणखी एक आर्थिक घोटाळा समोर आला आहे. नवी मुंबईतील एका ॲक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीने मोठ्या परताव्याचे अमिष दाखवून लाखो नवी मुंबईकरांना लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कंपनीविरोधात खारघर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कंपनीच्या मालकाला बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबईतील टोरेस कंपनीने केलेल्या आर्थिक घोटाळ्याने मुंबईकरांना मोठा धक्का दिला होता. कारण या घोटाळ्यात मुंबईकरांचे कोट्यावधी रुपये गुंतले आहेत. या घोटाळ्याची चर्चा सुरू असताना मुंबई नवी मुंबईतील आणखी एका कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची घटना समोर आली आहे. ॲक्वा मरीन ग्लोबल कल्चर असे फसवणूक करणाऱ्या कंपनीचे नाव आहे. या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदार मोहम्मद इस्माईल शेख यांच्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे.

कंपनीकडून मोठ्या परताव्याचे आश्वासन

मोहम्मद शेख हे मूळचे मुंबई अंधेरी शहरातील रहिवाशी आहे. शेख यांनी अंधेरीत असलेल्या ॲक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीत जवळपास १४ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. गुंतवणूक करताना शेख यांना कंपनीने मोठ्या परताव्याचे आश्वासन दिले होते. महिन्याला गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर १५ टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. गुंतवणूक केल्यानंतर शेख यांना दोन ते तीन महिने परतावा देखील मिळाला.

मात्र परतावा मिळणे बंद झाल्यानंतर शेख यांनी अंधेरी येथील कंपनीच्या ऑफिसला भेट दिली. मात्र कंपनीकडून उत्तर मिळत नसल्यामुळे कंपनीचे मुख्य कार्यालय नवे मुंबईत असल्याने त्या कार्यालयात जाण्याची सूचना तेथील कर्मचाऱ्यांनी दिली. त्यानुसार शेख हे खारघर येथील त्यांच्या मुख्य कार्यालयात गेले. तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी देखील उडवाउडवीची उत्तरे दिली. त्या उत्तरांमुळे शेख यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी थेट स्थानिक पोलीस स्टेशन गाठून, कंपनी विरोधात फसवणुकीची तक्रार दिली.

कंपनीचे मालक विनय कांबळेंना अटक

मोहम्मद शेख यांच्या तक्रारीनंतर खारघर पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद केली आहे. हा गुन्हा मुंबई अंधेरी एम आय डी सी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. हा गुन्हा एम आय डी सी पोलिसांकडे गेल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासला सुरुवात केली आहे. यानंतर मुंबई पोलीस आणि नवी मुंबई पोलीस खारघर यांनी शुक्रवारी संयुक्त कारवाई करत या कंपनीचे मालक विनय कांबळे यांना ताब्यात घेतले आहे. सध्या विनय कांबळे हे मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास मुंबई पोलीस करत आहे.

खारघर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर खारघर पोलिसांनी हा गुन्हा अंधेरी एम आय डी सी पोलिसांकडे वर्ग केला आहे. एम.आय.डी.सी पोलिसांकडे वर्ग केल्यानंतर, मुंबई पोलीस आणि खारघर पोलिसांनी संयुक्त पद्धतीने कारवाई करून कंपनीच्या मूळ मालक विनय कांबळे याला अटक केली आहे.

'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'.
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार.
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले.
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.