सिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात, 5 हजार पोलिस कर्मचारी नवी मुंबईत दाखल

प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र बुधवारी सिडको भवनला घेराव घालणार आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबईत मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. Navi Mumbai Airport naming Controversy Cidco ghrao Protest police Force deployed

सिडकोवर उद्या भव्य मोर्चा, पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात, 5 हजार पोलिस कर्मचारी नवी मुंबईत दाखल
सिडकोवर काढण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांकडून मोठा बंदोबस्त
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 2:14 PM

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी 24 जून रोजी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सिडकोला 1 लाखांचा घेराव घालण्याच्या तयारीत आहे. अशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबईला छावणीचं स्वरुप आलंय. नवी मुंबई आणि पनवेल मध्ये 5 हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले आहेत. (Navi Mumbai Airport naming Controversy Cidco ghrao Protest police Force deployed)

500 पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकारी, आज संध्याकाळपासून प्रकल्पग्रस्त नेत्यांना ताब्यात घेणार

मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे येथून पोलीस नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. तसंच राज्य राखीव दलाच्या 7 तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. जवळपास 500 पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकारी आंदोलन हाताळण्यासाठी सक्रिय झाले आहेत. पोलीस आज संध्याकाळ पासून प्रकल्पग्रस्त नेत्यांना ताब्यात घेण्यास सुरवात करणार आहेत. पोलिसांच्या माध्यमातून प्रत्येक गावाच्या मुख्य रस्त्यावर गावकाऱ्यांना रोखण्यात येणार आहे.

वाहतुकीत अनेक बदल

आंदोलनावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची खबरदारी घेऊन नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसंच वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आलेले आहेत.

यानुसार 24 जूनला सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 पर्यंत जड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर ठाणे बेलापूर रस्त्याला हलकी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली जाणार आहे. तर कोपरखैरणे ते सीबीडी, खारघर ते सीबीडी आणि नेरुळ ते सीबीडी अंतर्गत मार्ग राहणार पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच मुंबईतून पुण्याकडे जाणारी वाहतूक महापे शिळफाटा मार्गे पुण्याकडे जाईल. तर पुण्यावरून येणारी वाहतूक तळोजा, मुंब्रा, महापे मार्गे मुंबईत येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सिडकोला 1 लाखांचा घेराव घालण्याच्या तयारीत

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी 24 जून रोजी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सिडकोला 1 लाखांचा घेराव घालण्याच्या तयारीत आहे. अशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबईत मोठा फौजफाटा तयार करण्यात आलाय.

(Navi Mumbai Airport naming Controversy Cidco ghrao Protest police Force deployed)

हे ही वाचा :

नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक बंद, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

VIDEO: बाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं: राज ठाकरे

बाळासाहेबांबद्दल ‘त्यांना’ किती आदर हे समोर आलं, शिवसेनेचा राज ठाकरेंवर पलटवार

बाळासाहेब की दि. बा. पाटील, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत राज ठाकरेंनी वस्तूस्थिती मांडली

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.