केंद्र सरकारने लागू केलेला डाळीवरील कायदा रद्द करा, नवी मुंबईतील APMC मार्केटमधील मसाला आणि धान्य व्यापारांकडून बंदची हाक

आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेले मुंबई एपीएमसी मार्केटमधील मसाला आणि धान्य मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महिना ग्रोमाचे सचिव भीमजी भानुशाली यांनी दिली आहे.

केंद्र सरकारने लागू केलेला डाळीवरील कायदा रद्द करा, नवी मुंबईतील APMC मार्केटमधील मसाला आणि धान्य व्यापारांकडून बंदची हाक
Navi Mumbai APMC
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 3:13 PM

नवी मुंबई : केंद्र शासनाने डाळवर्गीय शेतीमालासाठी साठवण मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांना पाच टन, तर घाऊक व्यापाऱ्यांना 200 टन इतकाच डाळींचा साठा करता येणार आहे. या निर्णयाविरोधात राज्यात येत्या 16 जुलैला बाजार समित्या एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Navi Mumbai APMC Market spice and grain traders Shop Close against central government Act)

या पार्श्वभूमीवर आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेले मुंबई एपीएमसी मार्केटमधील मसाला आणि धान्य मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महिना ग्रोमाचे सचिव भीमजी भानुशाली यांनी दिली आहे. डाळींच्या किमती वाढत असल्याने ग्राहक नाराजी व्यक्त करत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने डाळ आयातीचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांना डाळ साठवणुकीसाठी मर्यादा निश्चित करण्यात आली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सरकारच्या या धोरणाचा निषेध केला आहे.

बाजार समितीतील व्यापार बंद

या साठवणूक मर्यादा विरोधात राजस्थान, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यातील बाजार समित्या बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात अकोला, अमरावती, लातूर या बाजार समित्यांमध्ये डाळीची आवक मोठ्या प्रमाणात होते. या बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्स या संघटनेची ऑनलाईन बैठकीत व्यापार बेमुदत बंद करण्याऐवजी राज्यव्यापी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डाळीच्या बाजार समित्या 16 जुलैला बंद

गेली 120 वर्षांपासून व्यापाऱ्यांसाठी ग्रोमा संस्था काम करते. त्याशिवाय सरकारच्या प्रत्येक निर्णयात आमचे सहकार्य असते. पण ग्रोमाला विश्वासात न घेता रातोरात हा कायदा करण्यात आला असल्याने आम्ही त्याचा विरोध करतो. त्यामुळे भारतातील संपूर्ण डाळीच्या बाजार समित्या 16 जुलैला बंद राहणार आहे.

यात मुंबई एपीएमसी मार्केटमधील 2 हजार व्यापारी सहभागी होणार आहोत. या काळ्या कायद्यामुळे आज 50 रुपयात भेटणारी डाळ उद्या 100 रुपयात मिळू शकते. यात थोडे दिवस आधी सरकार आयात सुरु केली, डाळींचा साठा पोर्टलवर टाकायला सांगितले. पुढच्या पंधरा दिवसात कायदा आणला. या कायद्यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागेल. सध्या डाळीचे दर हे एमएसपीपेक्षा 10 ते 20 टक्के कमी आहेत. तरी शासनाने हा निर्णय केवळ कार्पोरेट क्षेत्राला फायदा होण्यासाठी घेतला आहे, असा आरोप भीमजी भानुशाली यांनी केला.

(Navi Mumbai APMC Market spice and grain traders Shop Close against central government Act)

संबंधित बातम्या : 

महागाई, इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक, कार्यकर्त्यांसह वर्षा गायकवाडांची नवी मुंबईत सायकल रॅली

कोरोनामुळे 35 वर्षांपासून सुरू असलेला बँड बंद, पोटासाठी नवी मुंबईच्या रस्त्यावर ट्रंपेट वादन 

नवी मुंबईत 107 कोटींहून अधिक रक्कमेची मालमत्ताकर थकबाकी, पालिकेकडून थेट मालमत्ता जप्तीच्या नोटीसा

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.