Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmers protest: नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट उद्या बंद; माथाडी कामगारही संपावर

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी नवी मुंबईसह देशातील प्रमुख बाजारपेठा बंद राहणार आहेत. | Bharat Bandh

Farmers protest: नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट उद्या बंद; माथाडी कामगारही संपावर
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 10:50 AM

नवी मुंबई: गेल्या 11 दिवसांपासून दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा (Farmers Protest) वणवा आता देशभरात पसरला आहे. या पार्श्वभूमवीर मंगळवारी भारत बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रातून मोठ्याप्रमाणावर पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. (Bharat Bandh for Farmers protest)

त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) बंद ठेवण्यात येणार आहे. येथील माथाडी कामगारांनीही उद्या काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी नवी मुंबईसह देशातील प्रमुख बाजारपेठा बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये राज्यभरातून भाजीपाला आणि धान्याच्या गाड्या येतात. त्यानंतर याच बाजारपेठेतून मुंबई आणि लगतच्या परिसरात भाजीपाला व अन्नधान्याचा पुरवठा होतो. मात्र, शुक्रवारी ही बाजारपेठ बंद राहणार असल्याने भाजीपाला आणि इतर गोष्टींची आवकही बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना भाजीपाला आणि इतर आवश्यक गोष्टींचा साठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी हा बंद पाळा, संजय राऊतांचं आवाहन

भारत बंदला महाविकासआघाडी सरकारने पाठिंबा दिला आहे. आमचे तीन पक्ष इथे एकत्र आहेत. तिन्ही पक्षांनी पाठींबा दिल्याचे जाहीर केला आहे. हा बंद फार वेगळा आहे, अशी माहिती शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली.

हा कोणताही राजकीय बंद नाही. एखाद्या राजकीय पक्षाच्या मागण्या बंद करण्यासाठी नाही. तर शेतकऱ्यांचा आवाज बुलंद होण्यासाठी हा बंद पाळावा, असे आवाहन संजय राऊत यांनी नागरिकांना केले.

उद्या राज्यभरात चक्का जाम; दूध-फळ आणि भाज्या मिळणार नाहीत

भारत बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महाराष्ट्रातही चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. यामुळे दूध-फळ-भाज्यांच्या वाहतुकीवरही बंदी असणार आहे. पण विवाहसोहळे आणि आपत्कालीन सेवांवर कोणतंही बंधन असणार नाही. परंतु, उर्वरित व्यवहार आणि वाहतूक उद्या ठप्प असेल.

देशव्यापी आंदोलनासाठी हाक

कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावर तोडगा निघत नसल्यानं दिल्लीत आंदोलन करत असलेल्या जवळपास 40 शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या भारत बंदला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल आणि दिल्लीला येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येतील असा इशाराच शेतकरी संघटनांनी दिला आहे.

संबंधित बातम्या:

Farmers Protest | शेतकऱ्यांसाठी 30 खेळाडू मैदानात, राष्ट्रपतींकडे पुरस्कार परत करणार!

FARMER PROTEST | भाजपचा अजून एक मित्रपक्ष NDAतून बाहेर पडणार? 8 डिसेंबरनंतर निर्णय!

(Bharat Bandh for Farmers protest)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.