नवी मुंबईत सुरक्षा व्यवस्थेचा बट्ट्याबोळ, बच्चे कंपनींसाठी कृत्रिम तलाव झाला स्विमिंग पूल
नवी मुंबई महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य विर्सजन घाटांवर गर्दी होऊ नये, यासाठी शहरात 151 कृत्रिम विर्सजन तलाव साकारले आहेत. मात्र, याठिकाणी पालिकेचे कर्मचारी तैनात नसल्यामुळे लहान मुलांनी त्याला स्विमिंग पूल केले आहे. शिवाय, एखादी दुर्घटना घडण्याची शक्यताही परिसरातील नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य विर्सजन घाटांवर गर्दी होऊ नये, यासाठी शहरात 151 कृत्रिम विर्सजन तलाव साकारले आहेत. मात्र, याठिकाणी पालिकेचे कर्मचारी तैनात नसल्यामुळे लहान मुलांनी त्याला स्विमिंग पूल केले आहे. शिवाय, एखादी दुर्घटना घडण्याची शक्यताही परिसरातील नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे.
ऐरोली सेक्टर तीनमध्ये पालिकेने कृत्रिम तलाव तयार केला आहे. मंगळवारी पाच दिवसांच्या बाप्पांसह गौराईंचे विसर्जन होणार असल्याने त्यात पाणी भरण्यात आले. मात्र सुरक्षा व्यवस्था नसल्याने बच्चे कंपनीने तलावात पोहण्याचा आनंद घेतला. त्यामुळे भक्तांकडून संताप व्यक्त केला. याबाबत नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहर अध्यक्ष निलेश बानखीले यांना माहिती मिळताच पालिकेशी संपर्क साधून तलावातील पाणी बदलून घेतले.
गणपती विसर्जनासाठी महापालिकेने ठेवलेल्या टँकमध्ये लहान मुलं उड्या मारत आहेत. चुकून कोणी बुडालं किंवा काही कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार कोण? फक्त टेंडर द्यायचे आणि पैसे कमवायचे बाकी महापालिकेला काही कोणाचा पडलं नाही असा आरोप मनसे चे निलेश बानखीले यांनी केले आहे.
एकूण 156 कृत्रिम विसर्जन तलाव निर्माण करण्यास आयुक्तांची परवानगी
विसर्जनाच्या दिवशी गर्दी न होण्याच्या दृष्टीने मागील वर्षी 22 पारंपारिक मुख्य विसर्जन स्थळांच्या जोडीला एकूण 135 कृत्रिम विसर्जन तलावांची सर्व विभागांमध्ये निर्मिती करण्यात आली होती. या संकल्पनेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे मागील वर्षीच्या विसर्जनाचा आढावा घेऊन यावर्षी नागरिकांना अधिक सोयीचे होईल अशा नवीन 21 कृत्रिम तलावांची वाढ करण्यात आली. आता एकूण 156 कृत्रिम विसर्जन तलाव निर्माण करण्यास आयुक्तांनी यापूर्वीच परवानगी दिली आहे.
गणेशोत्सवासाठी नवी मुंबई महानगरपालिकेसह पोलीस सज्ज, कोव्हिड नियमांचं पालन करण्याचं आयुक्तांचं आवाहनhttps://t.co/Dv1Z8MKUX4#Ganeshotsav #NaviMumbai #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 5, 2021
संबंधित बातम्या :
खडू, पेन्सिल रुसले, रुसला माझा फळा…, गणेश सजावटीतून प्रबोधनात्मक देखावा