TV9 Impact : एपीएमसी मार्केटमधील गर्दीची दखल, APMC मार्केटमध्ये अचानक आयुक्तांची एन्ट्री

एपीएमसी मार्केट परिसरात 1 मार्च रोजी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचा प्रकार टीव्ही 9 मराठीने उघड केल्यानंतर याची दखल थेट पालिका प्रशासनाने घेतली.

TV9 Impact : एपीएमसी मार्केटमधील गर्दीची दखल, APMC मार्केटमध्ये अचानक आयुक्तांची एन्ट्री
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 12:54 AM

नवी मुंबई : एपीएमसी मार्केट परिसरात 1 मार्च रोजी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचा प्रकार टीव्ही 9 मराठीने उघड केल्यानंतर याची दखल थेट पालिका प्रशासनाने घेतली. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सकाळी दहा वाजता अचानक एपीएमसी मार्केटमधील फळ आणि भाजीपाला मार्केटला भेट दिली. तसेच कोरोना नियमांचं पालन होतंय की नाही याची तपासणी केली. एपीएमसी प्रशासन आणि विभागाला माहिती न देता आयुक्तांच्या अचानक भेटीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या (Navi Mumbai Commissioner Abhijit Bangar inspect APMC amid Corona infection).

आयुक्तांनी ठिकठिकाणी जवळपास तासभर पाहणी केली. यावेळी प्रचंड गर्दी, पॅसेजमधील अवैध व्यापार, घाऊक मार्केटमध्ये बेकायदा किरकोळ व्यापार, पान टपऱ्या, भेळ, लस्सी आणि चहासारखे किरकोळ विक्रेते पाहायला मिळाले. मार्केट परिसरातील मास्क वापर आणि सामाजिक अंतर पाळण्यात येत नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणासाठी संचालक मंडळ आणि एपीएमसी प्रशासनाला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

व्यापारी आणि ग्राहकांसह सर्वच घटकांकडून सहकार्य न मिळाल्यास कठोर कारवाई करणार

परिस्थिती नियंत्रणात राहील आणि कारवाई करण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच एपीएमसीतील व्यापारी आणि ग्राहकांसह सर्वच घटकांकडून सहकार्य न मिळाल्यास कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. शिवाय या ठिकाणी कारवाई भरारी पथकाची कान उघाडणी करण्यात आली.

एपीएमसीसाठी विशेष पथकाची रचना करणार

सध्या नवी मुंबई महापालिका परिसरात कोरोना रुग्ण दीडशेच्या वर गेल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. मागच्या सारखे एपीएमसी मार्केट कोरोनाचे पुन्हा हॉटस्पॉट होऊ नये याकरिता पालिका प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे आयुक्तांनी पाहणी दौरा करून विशेष सूचना दिल्या आहेत. तसेच एपीएमसीसाठी विशेष पथकाची रचना करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

हेही वाचा :

टीव्ही 9 मराठी इम्पॅक्ट : एपीएमसी मार्केटमध्ये एफडीएची मोठी कारवाई! प्रतिबंधात्मक गुटखा जप्त, 8 ते 10 जण ताब्यात

एपीएमसीतील मुख्यलेखाधिकाऱ्यांसह सहकाऱ्याला कोरोना, एपीएमसीची अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता

सेसविरोधात व्यापाऱ्यांचा एल्गार, महाराष्ट्रातील 300 पेक्षा अधिक एपीएमसी मार्केटचा कडकडीत बंद

व्हिडीओ पाहा :

Navi Mumbai Commissioner Abhijit Bangar inspect APMC amid Corona infection

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.