नवी मुंबईतील उद्यान घोटाळाप्रकरणी अधिकारी आणि कंत्राटदारावर निलंबनाची कारवाई

ठेकेदारांनी अनेक ठिकाणची कामेच केली नाहीत, तर उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही देयके न तपासताच मंजूर केली होती. | Navi Mumbai

नवी मुंबईतील उद्यान घोटाळाप्रकरणी अधिकारी आणि कंत्राटदारावर निलंबनाची कारवाई
सायन-पनवेल महामार्ग उजाळणार; दिवाबत्ती देखभालीची जबाबदारी नवी मुंबई महापालिकेकडे
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 3:32 PM

नवी मुंबई: गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईत (Navi Mumbai) गाजत असलेल्या उद्यान घोटाळाप्रकरणी प्रशासनाकडून अखेर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी कंत्राटदार आणि सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे. तीन सरकारी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये मनपा उद्यान अधिकारी चंद्रकांत तायडे, सहाय्यक उद्यान अधिकारी भालचंद्र गवळी आणि उद्यान अधीक्षक प्रकाश गिरी यांचा समावेश आहे. तर दोन कंत्राटदारांचे कंत्राट रद्द करण्यात आले. (Navi Mumbai garden scam)

लॉकडाऊनच्या काळात कोणतीही कामे न करता कंत्राटदारांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमताने 8 कोटींची बिले मंजूर करवून घेतली होती. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी या घोटाळ्याविरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे नवी मुंबईत हे प्रकरण चांगलेच गाजले होते. या घोटाळ्यातील कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांना 15 दिवसांत 8 कोटी 34 लाख रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काय आहे उद्यान घोटाळा?

ठेकेदारांनी अनेक ठिकाणची कामेच केली नाहीत, तर उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही देयके न तपासताच मंजूर केली होती. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात वंडर्स पार्क, रॉक गार्डन यासह २८० उद्याने आहेत. या उद्यानांची यापूर्वी प्रकल्पग्रस्त ठेकेदारांमार्फत विभागानुसार देखभाल केली जात होती.

मात्र, गेल्या वर्षी ही परंपरागत ठेकेदारी पद्धत रद्द करीत परिमंडळ १ व परिमंडळ २ अशी विभागणी करीत फक्त दोनच ठेकेदारांनी ही कामे देण्यात आली होती. १ मेपासून ही कामे देण्यात आली होती. मात्र करोनाच्या काळात उद्यानांची देखभाल दुरुस्तीकडे ठेकेदारांनी दुर्लक्ष केले. कामाची देयके मात्र घेतली, यावर लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला होता.

संबंधित बातम्या:

नवी मुंबईच्या कोविड टेस्टिंग सेंटरमध्ये मोठा घोटाळा; 10 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अहवाल देऊन पैसे लाटल्याचा प्रकार उघड

नवी मुंबईतील कोविड टेस्टिंग घोटाळाप्रकरणी सरकारची कारवाई; एक अधिकारी निलंबित

(Navi Mumbai garden scam)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.