Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navi Mumbai | सायन-पनवेल महामार्ग उजाळणार; दिवाबत्ती देखभालीची जबाबदारी नवी मुंबई महापालिकेकडे

वाशी टोल नाका ते कोकण भवनपर्यंत पथदिव्यांच्या देखभालीची जबाबदारी यावी यासाठी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या अध्यक्षतेखाली 15 सप्टेंबरला दोन्ही प्राधिकरणाच्या वतीने संयुक्त पाहणीही करण्यात आली होती. बांधकाम विभागाने हस्तांतरणाला हिरवा कंदील दाखविला आहे.

Navi Mumbai | सायन-पनवेल महामार्ग उजाळणार; दिवाबत्ती देखभालीची जबाबदारी नवी मुंबई महापालिकेकडे
सायन-पनवेल महामार्ग उजाळणार; दिवाबत्ती देखभालीची जबाबदारी नवी मुंबई महापालिकेकडे
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 5:56 PM

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील दिवाबत्तीची देखभाल करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने महानगरपालिकेकडे हस्तांतर केली आहे. हस्तांतरित करण्यापूर्वी दुरुस्तीसाठी 8 कोटी 29 लाख रुपये निधी मनपाला देण्यात आला आहे. महामार्गावरील 4 भुयारी मार्गांच्या देखभालीची जबाबदारीही मनपाकडे देण्यात आली आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्वाधिक वाहतूक असणाऱ्या रस्त्यांमध्ये सायन-पनवेल महामार्गाचा समावेश आहे.

शासनाने जवळपास 1200 कोटी रुपये खर्च करून महामार्गाचे रुंदीकरण केले आहे. पण दिवाबत्ती व भुयारी मार्गांच्या देखभालीकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याने महामार्गाची निळा झाकळू लागली होती. शिवाय अंधारामुळे महामार्गावर नियमित अपघात होत असतात. भुयारी मार्ग सुरु नसल्यामुळेही पादचाऱ्यांची गैरसोय होत असते. मोठ्या जिकरीचे रस्ता ओलांडावा लागत आहे. महामार्ग देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्यामुळे त्याच्या देखभालीसाठी मनपाला खर्च करता येत नव्हता. महामार्गाची योग्य देखभाल होत नसल्यामुळे स्वच्छता अभियानाच्या कामगिरीवरही परिणाम होऊ लागला होता. यामुळे महामार्गावरील पथदिव्यांची देखभाल करण्याची जबाबदारी महानगरपालिकेने घ्यावी, अशी मागणी अनेक नगरसेवकांनी केली होती.

चार भुयारी मार्गाची जबाबदारीही मनपाकडे

या मागणीची दखल जबाबदारी घेण्याची तयारी केली होती. याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू केला होता. शासनस्तरावर अनेक बैठकाही घेण्यात आल्या होत्या. वाशी टोल नाका ते कोकण भवनपर्यंत पथदिव्यांच्या देखभालीची जबाबदारी यावी यासाठी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या अध्यक्षतेखाली 15 सप्टेंबरला दोन्ही प्राधिकरणाच्या वतीने संयुक्त पाहणीही करण्यात आली होती. बांधकाम विभागाने हस्तांतरणाला हिरवा कंदील दाखविला आहे. वाशी टोल नाका ते कोकण भवनपर्यंतचे पथदिवे ट्रान्सफॉर्मर विद्युत यंत्रणा, विद्युत मीटर महानगरपालिकेकडे हस्तांतर केल्या आहेत. यापूर्वी दुरुस्तीकरीता लागणारे अंदाजपत्रक बांधकाम विभागाला दिले होते. विद्युत विभागाने पडताळणी करून मनपाला 8 कोटी 29 लाख रुपये दिले आहेत. याशिवाय चार भुयारी मार्गाची जबाबदारीही मनपाकडे दिली आहे.

लवकरच भुयारी मार्ग नागरिकांसाठी खुले होणार

महामार्गावरील नेरुळमधील दोन पादचारी भुयारी मार्ग, एसबीआय कॉलनीसह चार पादचारी भुयारी मार्गाच्या देखभालीची जबाबदारीही मनपाने घेतली आहे. त्याठिकाणी असलेल्या गैरसोयीची सुविधा देखील महापालिका करणार आहे. यामुळे लवकरच भुयारी मार्ग नागरिकांसाठी खुले होऊ शकणार आहेत. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सायन -पनवेल महामार्गावरील पथदिव्याचा प्रश्न सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे मार्गी लागला आहे. यापुढे महामार्ग कायमस्वरूपी प्रकाशमान राहणार आहे. (Navi Mumbai Municipal Corporation is responsible for the maintenance of street lights on Sion-Panvel Highway)

इतर बातम्या

Sharad Pawar: वाढदिवसाला भेटायला येऊ नका, शरद पवार ‘व्हर्च्युअल रॅली’तून शुभेच्छा स्वीकारणार, जयंत पाटील यांची माहिती

Omicron : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर BMC ॲलर्ट, अवघ्या 9 रुपयात अँटिजेन टेस्ट किट, अर्ध्या तासात अहवाल

विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.