परदेशी जाणाऱ्या नागरिकांसाठी नवी मुंबई महापालिकेची विशेष लसीकरण मोहीम

परदेशी जाणाऱ्या नागरिकांनीसुद्धा लसीचा डोस घेणे आवश्यक असून सद्यःस्थितीत कोव्हीशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 12 ते 16 आठवड्यांच्या अंतराने दुसरा डोस देण्यात येत आहे. याबाबत नवी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला असून परदेशी जाणे आवश्यक असलेल्या अनेकांनी दुसरा डोस लवकर देण्यात येत आहे.

परदेशी जाणाऱ्या नागरिकांसाठी नवी मुंबई महापालिकेची विशेष लसीकरण मोहीम
तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिका सज्ज
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 2:49 PM

नवी मुंबई : परदेशी जाणाऱ्या नागरिकांनीसुद्धा लसीचा डोस घेणे आवश्यक असून सद्यःस्थितीत कोव्हीशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 12 ते 16 आठवड्यांच्या अंतराने दुसरा डोस देण्यात येत आहे. याबाबत नवी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला असून परदेशी जाणे आवश्यक असलेल्या अनेकांनी दुसरा डोस लवकर देण्यात येत आहे. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशाप्रमाणे पालिका क्षेत्रात परदेशात जाण्याचे नियोजन असलेल्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत ज्यांचा पहिला डोस झाला व २८ दिवस पूर्ण झाले आहेत, अशांना दुसरा डोस देण्यात येत आहे.

शिक्षण, कामाकरिता व नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेस जाण्याकरिता लसीचा दुसरा डोस 28 दिवसांनंतर देण्याबाबत सूचित करण्यात आले होते. त्यानुसार 16 जूनपासून 31 ऑगस्ट २०२१ पर्यंत शिक्षण, नोकरी व टोकिओ ऑलिम्पिककरिता परदेशी जाणाऱ्या 1655 नागरिकांना कोव्हीशिल्ड लसीचा दुसरा डोस 28 दिवसानंतर देण्यात आलेला आहे. यामध्ये सुधारणा करीत शासनाच्या वतीने 23 ऑगस्ट 2021 रोजी परिपत्रक काढण्यात आले आहे. या अनुषंगाने शिक्षण व नोकरीसोबतच अत्यंत अत्यावश्यक कामानिमित्त परदेशी जावयाचे असल्यास दुसरा डोस 28 दिवसांनी देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या धर्तीवर परदेशात विविध कारणास्तव जायचे असल्यास आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून त्यांस कोव्हीशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवस पूर्ण झाले असल्यास दुसरा डोस दिला जात आहे.

परदेशी शिक्षण नोकरीसाठी जाताय?, लसीकरण करुन घ्या

याकरिता नवी मुंबई पालिका मुख्यालयातील अॅम्फीथिएटर येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी 2 ते सायं. 5 या वेळेत आवश्यक कागदपत्रे प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रांमध्ये सदर व्यक्ती नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात रहात असल्याचे आधारकार्ड, भाडेकरार, इलेक्ट्रीसिटी बिल, पासपोर्ट इत्यादी रहिवास पुरावा असणे गरजेचे आहे.

त्याचप्रमाणे परदेशात शिक्षणासाठी वा नोकरीसाठी निवड झाल्याची कागदपत्रे, अत्यावश्यक कारणासाठी जाण्याची कागदपत्रे, पासपोर्ट, व्हिसा, पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रांचा समावेश आहे. या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती लाभार्थ्याने स्वाक्षांकित करावयाच्या आहेत.

मुख्यालयात कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असून त्यावर लसीकरण मोहिमेसाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांनी कागदपत्रे योग्य असल्याचे प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांना नवी मुंबई पालिकेच्या सेक्टर १५ नेरूळ येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालय येथे लसीकरण करण्यात येत आहे. सप्टेंबर महिन्यात 63 लाभार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घेतला असून 16 जूनपासून आतापर्यंत 1718 नागरिकांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेतला आहे.

नवी मुंबईत किती लोकांचं लसीकरण

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लसींच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाचे नियोजन करण्यात येत असून लवकरात लवकर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण व्हावे यावर भर देण्यात येत आहे. आतापर्यंत नऊ लाख 50 हजार 888 नागरिकांनी म्हणजेच 90 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच चार लाख 10 हजार 734 नागरिकांनी म्हणजेच 39 टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.

(Navi Mumbai Municipal Corporation special vaccination campaign for citizens going Foreign)

हे ही वाचा :

नवी मुंबई एपीएमसी परिसरात मृतदेहाचे तुकडे करुन गटारात फेकणारा आरोपी गजाआड

खडू, पेन्सिल रुसले, रुसला माझा फळा…, गणेश सजावटीतून प्रबोधनात्मक देखावा

बेलापूरच्या आग्रोळी गावात पारंपरिक गौरी पूजनाचा थाट, सोनपावलांनी आलेल्या गौरींचे आज विसर्जन

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.