Navi Mumbai Accident : पामबीच रोडवर भीषण अपघात! दूध टाकण्यासाठी गेलेल्या तरुणाला कारची जोरदार धडक, झाडीत फेकला गेलेला तरुण जागीच ठार
Palm beach road accident : या अपघातात दुचाकीस्वराचा जागेवर मृत्यू झाला.
नवी मुंबई : नवी मुंबईच्या (Navi Mumbai Accident) पामबीच रोडवर (Palm Beach Road Accident) टी एस चाणक्य सिग्नल येथे भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वराचा जागेवर मृत्यू झाला. एक्टिवा वरील चालक हा बेलापूरकडून वाशी येणाऱ्या रोडवरून तो कारावे गाव मध्ये जात होता यावेळी वाशीकडून बेलापूरकडे येणाऱ्या हुंडाई वेरना (Hyndai Verna) कार चालकाने त्यास धडक दिली. यात मोटार वाहन चालक हा झाडीत उडून फेकला गेला. दरम्यान, या अपघातातील धडक प्रचंड जोरात असल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. समोरासमोर धडक झाल्याने हा कार आणि दुचाकीचा चक्काचूर या अपघातामध्ये झाला. मनोज विश्वकर्मा वय वर्ष 22 असे या अपघातात मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. एनआरआय पोलिसांनी कार चालकाच अपघातानंतर ताब्यात घेतलंय. रविवारी सकाळी साडे सात आठ वाजण्याच्या दरम्यान, हा अपघात घडला.
दूध टाकायला गेलेल्या तरुणावर काळाचा घाला
मनोज विश्वकर्मा हा तरुणा दूध विक्रीचं काम करायचं. दूध देण्यासाठीच तो निघाला होता. मात्र वाटेतच काळानं त्याच्यावर घाला घातला. ऐन तारुण्यात अपघाती मृत्यू झाल्यानं या तरुणाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भीषण धडकेत या तरुणाला जबर मार लागून त्याचा जागीच जीव गेला. पोलिसांनी या तरुणाचा मृतेदह ताब्यात घेतला असून पुढील कारवाई केली जाते आहे.
अपघाताचं सत्र सुरुच
या अपघातानंतर नवी मुंबईच्या पाम बीच रोडवर वाहनांच्या वाढत्या अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.नवी मुंबईत अनेक वाहनांचे बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे अपघात झालेले आहे. या अपघातानंतर कित्येकांनी याआधीही जीव गमावला आहे. मात्र त्यानंतरही या मार्गावरील वाहनांचा वेग कमी होण्याचं नाव घेत नाहीये. सातत्यानं नवी मुंबईचा पाम बीच रोड हा मार्ग मृत्यूचा सापळा बनत असल्याचं पाहायला मिळतंय.