Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Accident : पाम बीचवर Hyndai i20 चा भीषण अपघात! गाडीचा अक्षरशः चुरा, दोघे गंभीर जखमी

Navi Mumbai Palm beach Road accident : ह्युंदाई i20 कारमधून जात असताना सानपाडा जवळ कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटला.

Accident : पाम बीचवर Hyndai i20 चा भीषण अपघात! गाडीचा अक्षरशः चुरा, दोघे गंभीर जखमी
पाम बीचवर भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 1:59 PM

नवी मुंबई : नवी मुंबईवरील (Navi Mumbai News) पाम बीच मार्गावर (Palm Beach Accident) पुन्हा एक भीषण अपघात झाला. एका भरधाव i20 कारने डिव्हायडरला धडक दिली. कारचा वेग इतका जबरदस्त होता, की कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चुरा झालाय. गाडीचं बोनेट, ड्राईव्हरच्या बाजूची काच, याचा मोठा फटका बसलाय. या कारमधून एक महिला आणि पुरुष प्रवास करत होते. त्या दोघांनाही गंभीर जखम झाली आहे. गंभीर जखमी झालेल्या दोघांवरही सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वाशी एमजीएम रुग्णालयात दोन्ही जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत. नवी मुंबईतल्या सानपाडातील (Sanpada) मोराज सर्कल जवळ हा अपघात घडला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं बचावकार्य केलंय. मात्र या अपघातामुळे पामबीच मार्गावरील अपघातांची मालिका कधी थांबणार, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केला जातोय.

पाम बीचवर वेगाला आवार घाला…

पाम बीच मार्गावर वेगाला आवर घालण्याचं आवाहन केलं जातंय. पाम बीच मार्गावर सुसाट वाहनं चालवून अपघात होण्याचं प्रमाण वाढलंय. दर दहा पंधरा दिवसांनी पाम बीचवर भीषण अपघाताच्या घटना वारंवार समोर येत आहेत. या मार्गावर वाहनांची संख्या कमी असल्यानं रात्रीच्या वेळेत बेदरकारपणे वाहनं चालवून अपघात होत असल्याच्या घटना अनेकदा समोर आल्यात.

ह्युंदाई i20 कारमधून जात असताना सानपाडा जवळ कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. कार अत्यंत वेगात असल्यामुळे कंट्रोल झाली नाही, जोरात डिव्हाडरवर जाऊन आदळल्यानं हा अपघात झाला.

हे सुद्धा वाचा

सुदैवानं जीवितहानी नाही!

मंगळवारी रात्री झालेल्या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवतहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात कारचं नुकसान झालंय. कारमधील महिला आणि पुरुष या अपघातातून बालंबाल बचावलेत. याआधी 3 मे आणि 4 मे असे सलग दोन दिवस पाम बीच मार्गावर अपघातांची मालिका पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता आणखी एका अपघातामुळे चिंता वाढली आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.