टिटवाळ्यावरुन वाशीला जीव द्यायला आला! नोकरी नसल्यानं पुलावरुन उडीही टाकली आणि…

Suicide attempt in Vashi : नोकरी मिळत नसल्यामुले मुख्तार खान याला नैराश्य आलं होतं. लॉकडाऊनमुळे शिक्षणाचा आधीच खेळखंडोबा झाला होता. त्यात नोकरी नाही, म्हणून या तरुणाचं जगणं मुश्किल झालं होतं.

टिटवाळ्यावरुन वाशीला जीव द्यायला आला! नोकरी नसल्यानं पुलावरुन उडीही टाकली आणि...
वाशी खाडीपुलावरुन तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 5:17 PM

नवी मुंबई : वाशी खाडी पुलावरुन उडी टाकून आत्महत्याचे प्रयत्न (Suicide attempt) करणाचे प्रकार वारंवाड घडताना दिसतात. असाच प्रकार पुन्हा एकदा घडला होता. एका तरुणानं वाशी खाडी पुलावरुन उडी टाकत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवानं हा तरुण बचावला आहे. स्थानिक मच्छिमारांनी (Navi Mumbai Fishermen’s) दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या तरुणाचा जीव वाचला आहे. यानंतर या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पोलिसांच्या चौकशीत या तरुणानं आत्महत्येचं टोकाचं पाऊल का उचललं होतं, याचाही उलगडा झाला आहे. कोरोना महामारीत करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा (Lockdown) फटका अनेकांना बसला. हा तरुणही त्याला अपवाद नव्हता. या तरुणाची आर्थिक परिस्थिती खालावली होती. कोरोना महामारीचा फटका बसलेल्या या तरुणाला नैराश्य आलं होतं. नोकरी मिळत नसल्यानं निराश झालेल्या या तरुणानं आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं होतं.

टिटवाळ्यावरुन वाशीला जीव द्यायला आला!

आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या या तरुणाचं नाव मुख्तार खान असं आहे. तो टिटवाळा इथं राहाणार आहे. या तरुणानं वाशी खाडी पुलावरुन उडी टाक आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र सजग मच्छिमारांनी तत्काळ या तरुणाच्या दिशेनं धाव घेतली. यानंतर बोटीच्या मदतीनं या तरुणाला वाचवण्यात आलं. स्थानिक मच्छिमार बांधव आणि नवी मुंबई पोलिसांनी तत्काळ मदत केल्यामुळे या तरुणाचा जीव वाचला आहे.

तरुणाची चौकशी सुरु

नोकरी मिळत नसल्यामुले मुख्तार खान याला नैराश्य आलं होतं. लॉकडाऊनमुळे शिक्षणाचा आधीच खेळखंडोबा झाला होता. त्यात नोकरी नाही, म्हणून या तरुणाचं जगणं मुश्किल झालं होतं. आर्थिक ओढाताण, भविष्याची चिंता यामुळे बेहाल झालेल्या मुख्तारनं टोकाचा निर्णय घेत नवी मुंबईतल्या वाशी खाडी पुलावरुन उडी टाकली. सुदैवानं त्याचा जीव वाचला असून आता नवी मुंबई पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. या तरुणाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

आत्महत्या रोखण्याचं आव्हान

नवी मुंबईचा खाडीपूल हा आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी कुप्रसिद्ध ठरत चालला आहे. अशा घटना रोखण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहेच. शिवाय अशा घटना घडू नयेत, यासाठी सातत्यानं पोलिसही या ठिकाणी तैनात असतात. मात्र तरिदेखील वाशी खाडी पुलावरुन उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांना रोखायचं कसं, हा प्रश्नही कायम आहे.

संबंधित बातम्या :

कमी वयात सद्गुरु बारचा परवाना घेतल्याप्रकरणी अडचणी वाढ! समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल

VIDEO: मनसुख हिरेनच्या हत्येची सुपारी शिवसेनेने दिली, सोमय्यांचा गंभीर आरोप

नवी मुंबईला मुंबईशी अर्ध्या तासात जोडणारी वॉटर टॅक्सी परवडणारी आहे का? जाणून घ्या तिकीट दर

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.