100 टक्के लसीकरण हाच कोरोनावरील प्रभावी उपाय, पालिकेने लवकरात लवकर लस खरेदी करावी : गणेश नाईक

कोरोनाला पळवायचे असेल तर 100 टक्के नागरिकांचे लसीकरण हा एकमेव प्रभावी उपाय असल्याचे मत आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी मांडले आहे.

100 टक्के लसीकरण हाच कोरोनावरील प्रभावी उपाय, पालिकेने लवकरात लवकर लस खरेदी करावी : गणेश नाईक
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 12:11 AM

नवी मुंबई : कोरोनाला पळवायचे असेल तर 100 टक्के नागरिकांचे लसीकरण हा एकमेव प्रभावी उपाय असल्याचे मत आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी मांडले आहे. नाईक यांनी आज नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आयुक्तांना अनेक सूचना दिल्या. (NMMC should purchase Covid-19 Vaccines as soon as possible : Ganesh Naik)

आमदार गणेश नाईक यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्यासोबत नियमित घेत असलेल्या कोरोना नियंत्रण आढावा बैठकांमधून आतापर्यंत अनेक कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. आजही अशीच बैठक झाली. या बैठकीत नाईक यांनी प्रामुख्याने लसीकरण, शिक्षण, आरोग्य, पावसाळापूर्व कामे इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक आदी उपस्थित होते.

नाईक म्हणाले की, कोरोनाला पळवायचे असेल तर 100 टक्के नागरिकांचे लसीकरण हा एकमेव प्रभावी उपाय आहे. नवी मुंबईत पालिका आणि खासगी रूग्णालयांच्या माध्यमातून लसीकरण सुरू आहे. सोसायट्यांनाही लसीकरणासाठी परवानगी देण्यात येत आहे. सोसायट्यांच्या अर्जांवर कार्यवाही करून लवकरात लवकर त्यांना लसीकरणासाठी परवानगी द्यावी.

नवी मुंबई सुरु असलेल्या लसीकरणाची गती वाढविण्याची गरज आहे. पालिकेने लवकरात लवकर लस खरेदी करावी. त्यासाठी लस उत्पादक कंपन्यांसोबत पत्रव्यवहार करावा आणि लवकरात लवकर लस उपलब्ध करून द्यावी. जेव्हा केंद्र सरकार पालिकांना लस खरेदीसाठी परवानगी देईल, त्यावेळेस जागरूक राहून लस खरेदीची प्रक्रीया तातडीने सुरू करावी, अशी मागणी गणेश नाईक यांनी केली असता आयुक्त अभिजित बांगर यांनी ती मान्य केली.

डिस्चार्जपूर्वीच वैद्यकीय बिलांची पडताळणी करावी

आवाजवी बील आकारून खाजगी रुग्णालयांनी रूग्णांची लुट केल्याची प्रकरणे समोर येत आहेत. हे टाळण्यासाठी रूग्णाला डिस्चार्ज मिळण्यापूर्वीच पालिकेने त्याच्या बिलांची पळताळणी करावी, म्हणजे नंतर होणारे वाद उद्भवणार नाहीत, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली. त्यावर खुलासा करताना आयुक्त बांगर म्हणाले, रूग्णाला घरी सोडण्यापूर्वी 48 तास अगोदर त्याचे उपचाराचे बील पालिकेकडे रूग्णालयांनी पडताळणीसाठी पाठवावे, असे आदेश काढले आहेत. बिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी पालिकेने नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा, टॅब आणि डेस्कटॉपची व्यवस्था करा

गणेश नाईक म्हणाले की, कोरोना महामारीमुळे चालू शैक्षणिक वर्षात महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. खासगी शाळांच्या तुलनेत पालिका शाळांमधील विद्यार्थी मागे पडले. मात्र नवीन शैक्षणिक वर्षात हे चित्र बदलले पाहिजे. विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा अधिकार अबाधित राखण्यासाठी आतापासूनच अभ्यासक्रमाचे नियोजन करावे, असा सल्ला आमदार नाईक यांनी दिला. पालिका अर्थसंकल्पातील सर्वाधिक निधी हा शिक्षण आणि आरोग्यावर खर्च करावा. गरज पडली तर पालिकेने विद्यार्थ्यांना टॅब (टॅबलेट) द्यावेत. डेस्कटापॅकची व्यवस्था करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

माजी आमदार संदीप नाईक यांनी शिक्षकांना शिक्षकेतर कामांत गुंतवूण ठेवल्याने शिक्षणाचा दर्जा ढासळतो, असे मत मांडले. पालिकेने शिक्षण तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन शाळांचे नियोजन करावे, असा सल्ला दिला. त्यावर आयुक्त बांगर यांनी शिक्षण तज्ज्ञांना विचारून ऑनलाईन शिक्षण, अभ्यास साहित्य इत्यादींचे नियोजन मे महिन्यापूर्वीच करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

इतर बातम्या

सिडको सदनिका सोडतधारकांचा दुरुस्ती देखभाल खर्च माफ करा, सोशल मीडियावर विशेष मोहीम

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या, नाना पटोलेंची आग्रही मागणी

(NMMC should purchase Covid-19 Vaccines as soon as possible : Ganesh Naik)

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.