नवी मुंबई पालिकेच्या थकबाकी धारकांना नोटिसा, 21 दिवसांच्या आत कर भरा अन्यथा मालमत्ता विक्री करणार!
5 कोटी रुपयांची थकबाकी असणाऱ्या 26 जणांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातर्फे बजावण्यात आले आहेत. (Notice to 26 arrears holders of Navi Mumbai Municipal Corporation)
नवी मुंबई : मालमत्ता कराच्या कोट्यवधी रुपयांची थकबाकी असणार्यांविरोधात नवी मुंबई महापालिकेने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. 5 कोटी रुपयांची थकबाकी असणाऱ्या 26 जणांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातर्फे बजावण्यात आले आहेत. नोटीस बजावल्यापासून 21 दिवसांच्या आत रक्कम जमा न झाल्यास सदर मालमत्ता लिलावात विक्री केली जाणार आहे. (Notice to 26 arrears holders of Navi Mumbai Municipal Corporation)
थकबाकी वसूलीचे आयुक्तांचे आदेश
गेल्या अनेक वर्षांची मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्याचे आदेश नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. मालमत्ता कर हे पालिकेच्या प्रमुख उत्पन्ना स्त्रोतपैकी एक स्त्रोत आहे. त्याचीच वसुली होत नसून पालिकेच्या विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर करूनही आणि त्याला मुदतवाढ देऊनही प्रतिसाद न देणार्या थकबाकीदार मालमत्ताधारकांना जाणीव व्हावी याकरता नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
…अन्यथा मालमत्तेची विक्री
पाच कोटी रुपयांची थकबाकी असणाऱ्या 26 जणांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातर्फे बजावण्यात आले आहेत. नोटीस बजावल्यापासून 21 दिवसांच्या आत रक्कम जमा न झाल्यास सदर मालमत्ता लिलावात विक्री केली जाणार आहे.
तिसऱ्या लाटेआधी वसुली करा
साधारणतः ऑगस्ट महिन्यात करणाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोविड सुविधा उभारण्याकरिता लागणारा खर्च लक्षात घेता तसेच कोविड प्रभावी काळात विविध विभागातील कर्मचारी कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवण्याच्या कामात व्यस्त होत असल्याने 31 जुलैपर्यंत मालमत्ता कराची जास्तीत जास्त वसुली व्हावी. त्यातही मोठ्या रकमेच्या थकबाकीदारांकडून वसुलीसाठी झपाटून कामाला लागण्याचे निर्देश, नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी मालमत्ता कर विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
(Notice to 26 arrears holders of Navi Mumbai Municipal Corporation)
हे ही वाचा :
दि.बा.पाटील यांच्या नावासाठी सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक, 24 जूनला सिडकोला घेराव, 1 लाख लोक जमणार
CCTV VIDEO | गोळी झाडून मुलाची हत्या, नवी मुंबईतील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा प्रताप सीसीटीव्हीत कैद