Omicron Update | ओमिक्रॉनचा वाढता धोका! नवी मुंबईच्या एकाच शाळेतील 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, चिंता वाढली

नवी मुंबईच्या एका शाळेतील 16 विद्यार्थ्यी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे शाळेचं प्रशासनही हादरलं असून हे विद्यार्थी आठवी ते अकरावीतील असल्याची माहिती समोर आली आहे.

Omicron Update | ओमिक्रॉनचा वाढता धोका! नवी मुंबईच्या एकाच शाळेतील 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, चिंता वाढली
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 10:55 AM

नवी मुंबई : नवी मुंबईतून (Navi Mumbai) मोठी बातमी समोर येते आहेत. नवी मुंबईतील एकाच शाळेतील 16 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह (Covid Posititve) असल्याचं निदान झालंय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. इतक्या मोठ्या संख्येनं एकाच शाळेतील विद्यार्थ्यांना (Student) लागण झाल्याची माहिती समोर आल्यानं शाळेचं प्रशासनही हादरलंय. याच शाळेतील एका विद्यार्थ्याचे वडील कतारहून (Qatar) भारतात (India) परतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

खबरदारी म्हणून या विद्यार्थ्याच्या संपूर्ण कुटुंबीयांची कोविड चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत परदेशातून परतलेल्या वडिलांची टेस्ट निगेटिव्ह आली असली, तरी विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं चाचणीतून समोर आलंय. दरम्यान, विद्यार्थी ज्या नवी मुंबईतील शाळेत शिकत आहे, त्या शाळेतील 650 विद्यार्थ्यांची कोविड चाचणी करण्यात आली. ज्यात तब्बल 16 जणांना कोरोनाची लागण असल्याचं स्पष्ट झालंय. आता वेळीच याचा संसर्ग रोखण्याचं आव्हान नवी मुंबईसह शाळा प्रशासनासमोरही उभं ठाकलंय.

Corona

ओमिक्रॉन

तर दुसरीकडे मुंबईत अमेरिकेहून परतलेला एक 29 वर्षीय तरुण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आल्याची माहिती बीएमसीनं दिली आहे. त्यानं कोविड प्रतिबंधक फायजर लसीचे तीन डोस घेतले होते. 9 नोव्हेंबरला विमानतळावर तो कोविड पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पुढील चाचणीसाठी जेव्हा स्वॅब पाठवण्यात आले, त्यात हा तरुण ओमीक्रॉन पॉझिटिव्ह असल्याची बाब समोर आली आहे.

ट्रेसिंग आणि टेस्टिंगवर भर

ओमीक्रॉन पॉझिटिव्ह आढळलेल्या तरुणाच्या संपर्कातील सगळ्यांच्या कोविड चाचण्या करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती बीएमसी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यात तरुणाच्या संपर्कातील दोघंही जण कोविड निगेटिव्ह आढळून आलेत. सध्या ओमीक्रॉन पॉझिटिव्ह तरुणावर रुग्णालयाच उपचार सुरु आहे. तूर्तास तरुणाला कोणतीही लक्षणं दिसून आलेली नाही. मुंबई सध्याच्या घडीला एकूण 15 ओमीक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. ज्यातील 5 मुंबईच्या बाहेरील आहेत. ही संख्या वाढू नये, यासाठी बीएमसीकडून वेळीच खबरदारीची पावलं उचलली जात आहेत.

आतापर्यंत महाराष्ट्रातील ओमीक्रॉनच्या रुग्णांची संख्या 40 वर पोहोचली असून त्यापैकी 13 जण बरेही झाले आहेत. अजूनपर्यंततरी ओमीक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणं दिसून आलेली नाहीत.

CORONA AND BMC

CORONA AND BMC

थर्टीफर्स्टपर्यंत जमावबंदी

वाढत्या ओमीक्रॉन रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं आहेत. कोरोनाचा संसर्ग पुन्हा उफाळू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं बीएमसीनं सांगितलंय. त्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीची पावलं उचलली जात आहेत. ओमीक्रॉनचे आतापर्यंत सगळ्यात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून त्या पाठोपाठ दिल्ली (22), राजस्थान (17), गुजरात (4), कर्नाटक (3), केरळ (7), तेलंगणा (8), तर आंध्र प्रदेश, , पश्चिम बंगाल, चंदीगड आणि तामिळनाडूनतही प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

पाहा व्हिडीओ – 

इतर बातम्या – 

पुण्यातील ‘तो’ कोरोनाबाधित ओमीक्रॉन निगेटिव्ह; मात्र  डेल्टा व्हेरिएंटची लागण

दोन ज्येष्ठांच्या अवयवदानातून सहा जणांना नव’जीवन’; मुलींच्या पुढाकारातून वडिलांचे अवयवदान

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.