पामबीच रोडवर भरधाव कारची तीन गाड्यांना टक्कर, वाहतूक पोलीस थोडक्यात वाचला
नेरुळ पामबीच मार्गालगत सिग्नलवर तिन्ही कारच्या झालेल्या विचित्र अपघातात दोन किरकोळ जखमी तर नवी मुंबई वाहतूक पोलिस कर्मचारी सुखरूप आहेत. (Palm Beach Road Navi Mumbai Car Accident Traffic Police survived the Accident)
नवी मुंबई : नेरुळ पामबीच मार्गालगत सिग्नलवर तिन्ही कारच्या झालेल्या विचित्र अपघातात दोन किरकोळ जखमी तर नवी मुंबई वाहतूक पोलिस कर्मचारी सुखरूप आहेत. ही घटना रात्री 9 च्या सुमारास घडली आहे. (Palm Beach Road Navi Mumbai Car Accident Traffic Police survived the Accident)
भरधाव कारची तीन गाड्यांना टक्कर
नवी मुंबई वाशी वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी प्रमोद राजपूत आपली ड्युटी संपवून घरी जात होते. पामबीच मार्गालगत असणाऱ्या नेरुळ सिग्नलवर गाडी उभी राहिली होती. मागून आलेल्या भरधाव ह्युंदाई कंपनीची आय-20 कारने दोन वाहनांना विचित्र प्रकारे धडक दिली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी धडक दिलेल्या समोरील मारुती स्विफ्ट गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलिस कर्मचारी सुखरुप
या अपघातात गाडीचं जरी नुकसान झालेलं असलं तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दोन किरकोळ जखमी तर नवी मुंबई वाहतूक पोलिस कर्मचारी प्रमोद राजपूत सुखरुप आहेत.
(Palm Beach Road Navi Mumbai Car Accident Traffic Police survived the Accident)
हे ही वाचा :
टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, फरार टँकर चालकाला पोलिसांच्या काही वेळातच बेड्या