पनवेल-नवी मुंबईत 600 हून अधिक पोलिसांची बदली, पाच वर्षांचा काळ पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची ट्रान्सफर

बदली झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये 47 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 195 पोलीस हवालदार, 209 पोलीस नाईक, 195 पोलीस शिपाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पनवेल-नवी मुंबईत 600 हून अधिक पोलिसांची बदली, पाच वर्षांचा काळ पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची ट्रान्सफर
नागपुरातील गुन्हेगारी भागात पोलिसांनी लावले क्यूआर कोड
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 2:57 PM

नवी मुंबई : पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील 600 हून अधिक पोलिसांची आयुक्तालयाच्या अंतर्गत बदली करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 646 कर्मचाऱ्यांची बदली राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबई पोलीस आस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार करण्यात आली.

पोलीस ठाणे, नियंत्रण कक्ष, पोलीस मुख्यालय, वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, आरबीआय, अतिक्रमण आणि विशेष शाखेत कालावधी पूर्ण केलेल्या पोलिसांचा बदली प्रक्रियेत समावेश केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या बदली प्रक्रियेला सुरुवात झाली होती. सर्व कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक तपासणीअंती पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केलेल्या 646 कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली. त्यावर पोलीस आयुक्तालयातील आस्थापना मंडळाच्या निर्णयानुसार या बदल्या बुधवारी रात्री पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी केल्या.

कोणाकोणाची बदली?

पोलीस आयुक्तांनी बुधवारी रात्री नवी मुंबईतील 646 पोलिसांच्या सार्वत्रिक बदल्या केल्या. यामध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई पदांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पाच वर्षं एकाच पोलीस ठाण्यात काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा बदली प्रक्रियेत समावेश केला आहे. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये 47 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 195 पोलीस हवालदार, 209 पोलीस नाईक, 195 पोलीस शिपाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

राज्य सरकारचा 25 % बदलीचा आदेश

पोलीस आयुक्तांनी बदली केल्यानंतर 15 टक्के बदलीचा आदेश 25 टक्के करण्याचा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी घेतला. यामुळे पुन्हा उर्वरित 10 टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या येत्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी 150 ते 200 कर्मचाऱ्यांची बदली होईल.

औरंगाबाद शहर पोलिसातही बदलीचे वारे

दुसरीकडे, औरंगाबाद शहर पोलीस दलातील 809 पोलीस कर्मचाऱ्यांपैकी 560 जणांच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. शहर पोलीस दलातील हवालदार ते सहाय्यक फौजदारांच्या बदली करण्यास सुरुवात झाली आहे. तीन पसंतीच्या ठिकाणांपैकी एका जागी त्यांची बदली केली जात आहे. गृह मंत्रालय आणि पोलिस महासंचालक कार्यालयातून पोलीस आयुक्तांपासून ते अधीक्षक, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षकांचीही बदली होणार आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईतील बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीला सहा महिन्यांचा ब्रेक, कारण…

औरंगाबाद शहर पोलिसातील 560 कर्मचाऱ्यांची बदली, पीएसआय ते आयुक्त सर्वांचा नंबर लागणार?

(Panvel Navi Mumbai Police officers transfer order)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.