Cricket Betting : क्रिकेटच्या सट्टेबाजांवर पोलिसांची कारवाई, लॉज आणि मैदानातून 12 जणांना अटक

सध्या क्रिकेट सामने सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी सुरु आहे. गुन्हे शाखेच्या माध्यमातून सट्टे बाजांवर कारवाई करण्यासाठी चार-पाच टीम तयार करण्यात आल्या होत्या. या टीम सट्टेबाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होत्या. त्याच अनुषंगाने एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईदीप लॉजवर पोलिसांनी छापा टाकला.

Cricket Betting : क्रिकेटच्या सट्टेबाजांवर पोलिसांची कारवाई, लॉज आणि मैदानातून 12 जणांना अटक
आयपीएलच्या हक्कांची विक्रमी बोलीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 8:28 PM

नवी मुंबई / रवी खरात (प्रतिनिधी) : गेल्या दीड महिन्यांपासून क्रिकेटच्या मॅचेस सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर एपीएमसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईदीप लॉजवर छापा (Raid) मारुन 5 सट्टेबाजांना तर मैदानात बसून सट्टेबाजी (Betting) करणाऱ्या 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. काही जण स्टेडियममधून पळून जाण्यास यशस्वी झाले. स्टेडियममध्ये व लॉजमध्ये अशा एकूण 12 सट्टेबाजांना पोलिसांनी अटक केले आहेत. त्यांच्याकडून 7 लाखांचा मुद्देमाल आणि 10 ते 12 मोबाईल व डोंगल जप्त करण्यात आले असल्याची माहिती नवी मुंबईचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली. (Police crack down on cricket bookies in Navi mumbai, arrest 12 from lodge and ground)

लॉज आणि मैदानातून 12 सट्टेबाजांना अटक

सध्या क्रिकेट सामने सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी सुरु आहे. गुन्हे शाखेच्या माध्यमातून सट्टे बाजांवर कारवाई करण्यासाठी चार-पाच टीम तयार करण्यात आल्या होत्या. या टीम सट्टेबाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होत्या. त्याच अनुषंगाने एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईदीप लॉजवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत लॉजवरील 5 सट्टेबाजांना पोलिसांनी अटक केली. तसेच मैदानात बसून सट्टेबाजी करणाऱ्या 8 लोकांना अटक करण्यातही पोलिसांना यश आले आहे. चौकार षटकार तसेच विकेट यावर देखील हे सट्टेबाज सट्टा लावत होते. यापूर्वी मॅच हरणार की जिंकणार यावर सट्टा लावला जात होता. ऑनलाइन मॅच पाहून आरोपी सट्टा लावत होते. (Police crack down on cricket bookies in Navi mumbai, arrest 12 from lodge and ground)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.